7th Pay Commission : ठरलं तर! सरकारी कर्मचारी 8 मार्चला नव्हे तर या दिवशी होळी साजरी करणार, DA मध्ये होणार मोठी वाढ

Ahmednagarlive24 office
Published:

7th Pay Commission : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी दिली जाऊ शकते. कारण केंद्र सरकारकडून नवीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून लवकरच कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये भरघोस वाढ केली जाऊ शकते.

नवीन वर्षातील होळी यंदा ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. होळीदिवशी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्याआधीच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची होळी अगोदरच साजरी केली जाऊ शकते.

१ मार्च रोजी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून दिली जाऊ शकते. त्यामुळे देशातील सुमारे 47 लाख केंद्रीय कर्मचारी आणि देशातील 68 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होऊ शकतो.

1 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्या दिवशी केंद्रातील एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 2023 ची पहिली भेट मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलतीबाबत केंद्र सरकार अंतिम निर्णय घेऊ शकते.

केंद्रीय बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या बाबत काही निर्णय झाला तर कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपासून वाढीव पगार आणि पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळू शकते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये 3-3 भेटवस्तू मिळतील

महत्त्वाचे म्हणजे, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 2023 मध्ये प्रत्येकी तीन भेटवस्तू मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ, फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ आणि थकबाकी डीएचा समावेश आहे.

AICPI आकडेवारी प्रोत्साहन

डिसेंबर 2022 साठी AICPI ची आकडेवारी देखील कामगार मंत्रालयाकडून आली आहे. यावरून DA आणि DR मध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे दिसते. कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या डिसेंबर 2022 मधील AICPI आकडेवारी नोव्हेंबरच्या तुलनेत घसरली आहे.

एआयसीपीआयच्या आकडेवारीत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सातत्याने वाढ झाली होती. पण डिसेंबरमध्ये एआयसीपीआयच्या आकडेवारीत थोडीशी घसरण झाली आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरचा आकडा 132.3 अंकांवर घसरला आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हा आकडा 132.5 अंकांवर होता. सप्टेंबरमध्ये ते 131.3, ऑगस्टमध्ये 130.2 आणि जुलैमध्ये 129.9 होते. मात्र, त्यानंतरही महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होळीपूर्वी मोठी वाढ केली जाणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना ३८ टक्के DA मिळत आहे. तर सध्या कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जर ४ टक्क्यांनी DA वाढला तर कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe