तुमचेही जनधन खाते असेल तर 31 मार्चपर्यंत करा ‘हे’ काम; अन्यथा होईल लाखोंचे नुकसान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-आपण प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत जनधन खाते उघडले असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. प्रत्यक्षात सरकारने बँकांना सर्व खाती ग्राहकांच्या आधारशी 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करण्यास सांगितले आहे.

सरकारने सांगितले की 31 मार्च पर्यन्त ज्या खात्यात पॅन आवश्यक आणि योग्य असेल तेथे पॅन आणि प्रत्येक खात्यात आधार जोडणे आवश्यक आहे.

आपल्याकडे जन धन खाते असल्यास आपले बँक खाते आधारशी लिंक करा, अन्यथा आपण 2.30 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकणार नाही.

प्रधानमंत्री जन धन योजनेचा 41 कोटीहून अधिक लोकांना लाभ झाला आहे. या योजनेंतर्गत खात्यांची संख्या वाढून 41.75 कोटी झाली आहे.

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ही योजना त्याच वर्षाच्या 28 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली होती.

2.30 लाखांचा विमा मिळतो :-

  • >> जन धन खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे कार्ड दिले जाते.
  • >> या डेबिट कार्डवर एक लाख रुपये अपघात विमा मोफत मिळतो.
  • >> अपघात विमा 28.8.2018 नंतर 2 लाख रुपये करण्यात आला आहे.
  • >> या व्यतिरिक्त या कार्डवर 30,000 रुपयांचे विनामूल्य जीवन विमा संरक्षण उपलब्ध आहे.

अशा पद्धतीने जन धन खात्यास आधारशी लिंक करा :-

  • > तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याशी आधार ऑनलाईन जोडायचा असेल तर त्या खात्याचे इंटरनेट बँकिंग ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे.
  • > जर तुमचे नेट बँकिंग सक्रिय असेल तर तुमची नेट बँकिंग लॉग इन करा.
  • > लॉग इन केल्यावर तुम्हाला आधार नंबर लिंक करण्याचा पर्याय मिळेल.
  • > जर तुम्ही नेट बँकिंग वापरत नसाल तर तुम्ही बँकेत जाऊन खात्यास आधारशी लिंक करू शकता.
  • > जिथे तुम्हाला आधार कार्ड, तुमची पासबुकची झेरॉक्स द्यावी लागेल.
  • > बऱ्याच बँका आता मेसेजच्या माध्यमातूनही खात्यास आधारशी जोडत आहेत
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe