अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-सन 2021 -22 या आर्थिक वर्षासाठी सरकारने 1.75 लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2021 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही एलआयसीचा आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे.
या आयपीओवर सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सरकार एलआयसीचा आयपीओ जारी करेल तेव्हा त्यातील काही भाग एलआयसी पॉलिसीधारकांसाठी राखून ठेवला जाईल.
सरकारसाठी या अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीचे आणि खासगीकरणाचे लक्ष्य खूप महत्वाचे आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी सरकारने 2.1 लाख कोटी निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले होते,
परंतु कोरोनामुळे आतापर्यंत केवळ 20 हजार कोटी रुपये जमा करण्यात यश आले आहे. गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडेय यांनी
एका मीडियाला दिलेल्या विशेष संभाषणात म्हटले आहे की जेव्हा एलआयसीचा आयपीओ जारी केला जाईल तेव्हा आम्ही पॉलिसी होल्डर्सना गुंतवणूकदार बनविण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी पॉलिसीधारकांसाठी 10 टक्के पर्यंत राखीव ठेवण्याचा विचार विभागाने केला आहे.
1991 च्या आर्थिक सुधारणानंतर सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे तुहीन कांत पांडेय म्हणाले. निर्गुंतवणुकीसाठी व खासगीकरणासाठी आता सर्व नॉन-स्ट्रॅटेजिक क्षेत्रे सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीचे 2.1 लाख कोटींचे लक्ष्य :- 2021 च्या अर्थसंकल्पात निर्गुंतवणूक आणि खासगीकरणाबाबत घेतलेला निर्णय सरकारला फार महत्वाचा आहे. सरकारला पैशांची नितांत गरज आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये 2.1 लाख कोटींच्या निर्गुंतवणुकीच्या लक्ष्यापेक्षा आतापर्यंत मागे राहिल्याबद्दल डीआयपीएएम सचिव म्हणाले की कोरोनामुळे उशीर झाला आणि योग्य किंमत मिळाली नाही.
या अर्थसंकल्पात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एक विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved