Side effects of Brinjal : रोजच्या दैनंदिन जीवनात जेवण करण्यासाठी अनेकजण वांग्याची भाजी खात असतात. तसेच वांग्याची भाजी अनेकांची लोकप्रिय भाजी आहे. वांग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जेवणासाठी बनवल्या जातात. मात्र वांगी खाणे शरीरासाठी घटक ठरू शकते.
वांग्याची भाजी लोक आवडीने खात असतात. तसेच वांगी खाणे शरीरासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच धोकादायकही आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी वांग्याचा उपयोग होतो. तसेच वांगी खाणे हृदयाला चांगले मानले जाते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी वांगी फायदेशीर ठरतात. मात्र अशा काही समस्या वांगी खाल्ल्याने उद्भवू शकतात ज्या तुमच्या शरीरासाठी घटक ठरू शकतात.
वांगी खाल्ल्याने अनेकांना स्किन ऍलर्जीसारख्या समस्या आहेत. तसेच मूळव्याध असणाऱ्या व्यक्तींना देखील जास्त वांगी खाणे शरीरास हानिकारक ठरते.
या समस्यांमध्ये वांगी खाऊ नयेत
गर्भवती महिलांना वांगी खाणे धोकादायक ठरू शकते. हे गर्भधारणेदरम्यान वाढणाऱ्या गर्भासाठी हानिकारक ठरू शकते. त्याच्या सेवनाने नैसर्गिकरित्या लघवी वाढते, ज्यामुळे गर्भाला हानी पोहोचते. वांग्यांमध्ये आढळणारा नानुसिन नावाचा घटक या सगळ्यासाठी जबाबदार आहे.
वांग्याचे सेवन केल्याने गॅसची समस्या वाढते. ज्या लोकांची पचनसंस्था नाजूक आहे अश्या लोकांनी वांगी खाऊ नयेत.
डिप्रेशनमध्ये वांग्याचे सेवन करणेही हानिकारक असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही नैराश्याचे औषध घेत असाल किंवा त्याच्याशी संघर्ष करत असाल तर वांग्याचे सेवन करू नका, कारण याच्या सेवनाने शरीरावरील औषधाचा प्रभाव कमी होऊ लागतो.
जे लोक अॅनिमियाशी झुंज देत आहेत आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी वांग्याचे सेवन करू नये. याच्या वापरामुळे रक्ताचे प्रमाण वाढण्यास त्रास होतो.
मुतखडा आणि मूळव्याध असलेल्या लोकांनी देखील वांग्याचे सेवन अजिबात करू नये. वांग्यात आढळणाऱ्या ऑक्सलेटमुळे मुतखड्याची समस्या वाढू शकते, तर मूळव्याधची समस्याही वाढू शकते