IMD Alert : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दररोज बदलणाऱ्या हवामानामुळे देशातील काही राज्यात पुन्हा एकदा धो धो पावसाची सुरुवात झाली आहे तर काही राज्यात जोरदार बर्फवृष्टी होताना दिसत आहे. दरम्यान हवामान विभागाने 23 फेब्रुवारीपर्यंत 12 राज्यांना पावसाचा तर काही राज्यांना बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हवामानात मोठे बदल दिसून येतील. काही ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी दगड कोसळण्याची आणि हिमस्खलनाची समस्याही निर्माण होऊ शकते. यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पर्वतांवर पुन्हा एकदा बर्फवृष्टी सुरू होईल.
या राज्यांमध्ये पाऊस
जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. उद्यापासून पुन्हा एकदा अनेक भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
हवामान अपडेट
महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, मुंबई, गोव्यात तापमानात वाढ होणार आहे. ढगाळ वातावरण असले तरी थंडी पडण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये आकाश ढगाळ राहील. किमान तापमानात घट दिसून येईल. याशिवाय थंडीचा अनुभव पुन्हा एकदा वाढू शकतो.
डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरूच राहील, तर पूर्वेकडील राज्यांमध्येही 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थान, हरियाणा आणि इतर प्रदेशात तापमानात वाढ होईल तर आकाश ढगाळ राहील. जोरदार वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पूर्व राज्यात पावसाचा इशारा
अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिण भागांसह पूर्व आसाममध्ये पावसाची शक्यता आहे तसेच आजपासून अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. काश्मीरमध्ये बर्फवृष्टी जम्मू काश्मीरसह लेह लडाखमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज जारी करण्यात आला आहे. यासोबतच यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमवृष्टीमुळे गुजरात, राजस्थानसह हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये हवामान बदल दिसून येतील. दुसरीकडे, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशातही खालच्या पायथ्याशी बर्फवृष्टी आणि पाऊस पडेल.
4 दिवस पावसाचा अंदाज
गेल्या 24 तासांत आसाम मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलक्या पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर आजपासून चार दिवस या भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे 25 फेब्रुवारीपर्यंत अनेक भागात पाऊस दिसेल. याशिवाय जोरदार वारे वाहतील.
हे पण वाचा :- Nissan Magnite SUV : ‘या’ एसयूव्ही मध्ये मिळत आहे ‘इतके’ भन्नाट फीचर्स तेपण अवघ्या 6 लाखात !