IMD Rain Alert : बदलत असणाऱ्या हवामानामुळे देशातील अनेक भागात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.
यामुळे अनेकांना अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र आता या कडक उन्हाळ्यात एक दिलासादायक बातमी हवामान खात्याने दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस देशातील काही भागात धो धो पावसाची शक्यता आहे.
23 मे पासून एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स वायव्य भारतावर परिणाम करणार आहे तर दुसरीकडे नैऋत्य मान्सून पुढील 3 दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात, अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर सरकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील 5 दिवसांत देशातील अनेक भागात पाऊस पडू शकतो. IMD ने अंदाज वर्तवला आहे की 20 ते 24 तारखेदरम्यान आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. दुसरीकडे अरुणाचल प्रदेशात 20 आणि 21 मे रोजी आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 24 मे रोजी पावसाची शक्यता आहे.
याशिवाय पुढील 5 दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका पाऊस पडू शकतो. 20 मे रोजी ओडिशाच्या विविध ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 मे रोजी गंगेच्या काठावरील भागात वीज पडण्याची शक्यता आहे.
ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पश्चिम हिमालयीन भागात पाऊसही पडू शकतो. IMD नुसार 24 मे रोजी उत्तराखंडमध्ये गारपीट आणि वीज पडण्याची शक्यता आहे. येथे 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.
22 ते 24 मे दरम्यान राजस्थानच्या विविध भागात धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, 22 ते 24 मे दरम्यान छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.
हे पण वाचा :- Shukra Gochar Update : सावधान , शुक्राची चाल बदलणार, ‘या’ 3 राशींना होणार आर्थिक नुकसान