IMD Rainfall Alert: ‘मोचा’ चक्रीवादळाचा कहर ! आता ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा ; जाणून घ्या ताजे अपडेट्स

IMD Rainfall Alert:  सध्या मोचा चक्रीवादळाने मध्य बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व आणि लगतच्या भागात हाहाकार माजवला आहे.

तर दुसरीकडे या मोचा चक्रीवादळमुळे देशातील काही राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज 12 मे रोजी मोचा चक्रीवादळामुळे अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर 13 आणि 14 मे रोजी त्रिपुरा आणि मिझोराममध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

14 मे रोजीच नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसामच्या भागात मुसळधार पावसामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 12 मे रोजी अंदमानमध्ये 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. 14 मे रोजी त्रिपुरा, मिझोराम आणि दक्षिण मणिपूरमध्ये 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय, उद्या संध्याकाळपर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात 145 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert
 

हवामान खात्याने मच्छीमार, बोटी आणि इतरांना 12 मे रोजी बंगालच्या उपसागराच्या जवळ न जाण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय 14 मे पर्यंत मध्य बंगालचा उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्राच्या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दुसरीकडे 12 आणि 13 मे रोजी पश्चिम राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. याव्यतिरिक्त, 15 मे पासून पूर्व भारतातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

उद्यापासून चार दिवस पावसाचा इशारा

हवामान खात्यानुसार, 13 ते 16 मे दरम्यान ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 14 ते 16 मे दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये 13 ते 16 मे दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. दुसरीकडे, 15 मे रोजी अरुणाचल प्रदेशात, 15 आणि 16 मे रोजी आसाम आणि मेघालयात, 14 आणि 15 मे रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये अतिवृष्टी होणार आहे.

आदल्या दिवशीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर गुजरात, पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर ओडिशा या भागात 42-44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय अंतर्गत महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा काही भाग, दक्षिणपूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व राजस्थान आणि झारखंडमध्ये 40-42 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गुजरात, पूर्व बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ईशान्य भारतात कमाल तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसने अधिक नोंदवले गेले आहे.

या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 12 मे

12 आणि 13 मे रोजी गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये

12-14 मे पश्चिम मध्य प्रदेशात

विदर्भात 13 आणि 14 मे

15 आणि 16 मे बिहार, ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये कोस्टल आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये

हे पण वाचा :-  GST Rule Change : जीएसटी नियमात मोठा बदल ! 1 ऑगस्टपासून ‘या’ लोकांनाही भरावे लागणार ई-चलन, केंद्र सरकारची घोषणा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe