IMD Rainfall Alert: एप्रिल महिन्याच्या सुरुवाती पासून देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही राज्यात आता कडक उन्हाळा सुरु झाला आहे. देशातील बहुतेक राज्यात सुरु झालेल्या या कडक उन्हाळ्यामुळे आता नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मात्र आता हवामान विभागाने पुढील पाच दिवस पश्चिम बंगाल, बिहार, किनारी आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे 17 एप्रिलपासून पश्चिम हिमालयीन भागात आणि 18 एप्रिलपासून वायव्य भारताच्या मैदानी भागात हलका पाऊस पडेल. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 एप्रिल रोजी अनेक भागात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 20 आणि 21 एप्रिल रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. अशा स्थितीत कमाल तापमानातही घट नोंदवली जाईल.
तापमान चार अंशांपर्यंत खाली येईल
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उत्तर पश्चिम भारतातील राज्यांमध्ये पुढील दोन दिवस तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. त्यानंतर दोन ते चार अंशांनी घसरण होऊ शकते. दुसरीकडे, पूर्व भारताबद्दल बोलायचे झाल्यास पुढील पाच दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल दिसणार नाही.
मध्य भारतातील राज्यांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होऊ शकते. तीन दिवसांनंतर ते दोन अंशांनी घसरेल. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होईल.
या भागांमध्ये पाऊस, वादळाचा इशारा
पुढील पाच दिवसांत पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. यासोबतच वादळी वाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे. 18 आणि 19 एप्रिलला जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, 19 एप्रिल रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडेल.
याशिवाय 17 एप्रिलला जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश बद्दल बोलायचे झाले तर 18 एप्रिल आणि उत्तराखंड मध्ये 18 ते 20 एप्रिल दरम्यान गारपीट होईल.
हे पण वाचा :- New Driving License: ऑनलाइन बनवता येणार नवीन ड्रायव्हिंग लायसन्स ! जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया