Pashupalan Yojana : भारताला कृषिप्रधान देशात म्हणून ओळखले जाते. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक निणय घेतले जातात. आता देशी गाय असणाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक निणय घेतला आहे.
देशात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पशुपालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच सध्या दुधाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक हातभार लागत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/02/ahmednagarlive24-Pashupalan-Yojana.jpg)
ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करता असतात. यामधून त्यांना शेतीबरोबरच जास्तीचे उत्पन्न मिळत आहे. मात्र देशी गाय असणाऱ्यांसाठी सरकारने एक स्पर्धा सुरु केली आहे. या स्पर्धेद्वारे सरकारकडून ५१ हजार रुपये दिले जात आहेत.
पशुपालकांना दुग्धव्यवसायसाठी सरकारकडून विशेष योजना देखील राबवल्या जात आहेत. मध्य प्रदेश सरकारकडून देशी गायींचे संगोपन वाढवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
गोपाल पुरस्कार योजनेअंतर्गत देशी गायींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून एक स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत कोणत्याही पशुपालक बांधवाची देशी गाय जास्त प्रमाणात दूध देईल त्याला विजयी केले जाईल असे सांगण्यात येत आहे. रोख रक्कम म्हणून 51,000 रुपये बक्षीस दिले जाईल.
पशुपालकांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल
राज्य सरकारकडून या स्पर्धेचे आयोजन जिल्हास्तरीय पातळीवर करण्यात येत आहे. पहिल्या ३ विजेत्यांसाठी वेगवेगळी बक्षिसे देण्यात येत आहेत. प्रथम पारितोषिक 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 11,000 रुपये दिले जातील.
किती दिवस सुरु राहणार ही स्पर्धा
गोपाल पुरस्कार स्पर्धा 1 फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे जी 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धेमागचा उद्देश असा आहे की पशुपालकांनी जास्तीजास्त देशी गाई पाळाव्यात आणि त्यांचे दूध उत्पादन वाढवावे.