EPFO Alert : महत्त्वाची बातमी! खातेधारकांनो ईपीएफओचा इशारा जाणून घ्या नाहीतर तुमचेही होईल खूप मोठे नुकसान

Published on -

EPFO Alert : भविष्य निर्वाह निधी अर्थातच पीएफ सदस्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीच्या धोक्यापासून वाचण्यासाठी खबरदारीचा इशारा जारी केला आहे.

ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी खात्याला ऑनलाईन धोक्यापासून कसे वाचवायचे त्यासाठी टिप्स शेअर केल्या आहेत. हा इशारा काय आहे? ते जाणून घ्या नाहीतर घोटाळेबाजांच्या हाती तुमची महत्त्वाची माहिती लागली तर तुमचीही लाखो रुपयांची फसवणूक होऊ शकते.

काय सांगण्यात आले होते ईपीएफओच्या अलर्टमध्ये?

अलर्टमध्ये ईपीएफओच्या वतीने असे सांगितले की ईपीएफओ कधीही आपल्या सदस्यांकडून आधार, पॅन, यूएएन, बँक तपशील इत्यादींची माहिती विचारत नाही. तसेच जर कोणी तुम्हाला फोन किंवा सोशल मीडियावर अशी माहिती विचारत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही अशी कोणतीही माहिती अजिबात लीक करू नका. त्याशिवाय फसवणुकीशी निगडित फोन कॉल आणि कोणत्याही संदेशाला उत्तर देऊ नका.

दिली ही माहिती

ईपीएफओच्या वतीने सर्व वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी करत असताना, ट्विटमध्ये असे लिहिले की ‘सदस्यांना कधीही फोन किंवा सोशल मीडियावर आधार क्रमांक, पॅन, यूएएन, बँक खाते किंवा ओटीपी यांसारखे वैयक्तिक तपशील शेअर करा असे सांगण्यात येत नाही.

इतकेच नाही तर ईपीएफओ कधीही कोणत्याही सेवेसाठी व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया इत्यादीद्वारे कोणतीही रक्कम जमा करा असे सांगत नाही. लोकांची कमाई ही पीएफ खात्यात निवृत्तीच्या वेळेसाठी जमा करण्यात येते.

हे लक्षात घ्या की फसवणूक करणारे फिशिंग हल्ल्याद्वारे खात्यावर हल्ला करतात. फिशिंग हा ऑनलाइन फसवणुकीचा एक भाग आहे, ज्यामध्ये ठेवीदार फसतो आणि अडकतो. त्यांच्याकडून खात्याशी निगडित महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर खात्यातून पैसे काढण्यात येतात.

चुकूनही ही माहिती शेअर करू नका

पीएफ खातेधारकांनी चुकूनही त्यांचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक, यूएएन तसेच पीएफ खाते क्रमांक कोणाला शेअर करू नये. या सर्व गोष्टी गोपनीय असून, ही माहिती लीक झाली तर तुमचे खाते रिकामे होऊ शकते.

पहिली नोकरी सोडून दुसरी जॉईन करता तेव्हा अशी फसवणूक अनेकदा पाहायला मिळते. या दरम्यान, जर तुम्हाला फिशिंग कॉल्स किंवा मेसेजद्वारे वैयक्तिक माहिती विचारली जात असेल, तर लगेच त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News