48 तासात सोन्याचे दर 1500 रुपयाने घसरले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- सोने-चांदीच्या किंमतीत नेहमीच चढ-उतार पाहायला मिळतात. आज मंगळवारी (2 फेब्रुवारी) सोने-चांदीच्या किंमतीत घट झाली आहे.

दिल्ली सराफत सोन्याचे दर 480 रुपयांनी कमी होऊन 47,702 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. त्याचबरोबर चांदीचे दर 3,097 रुपयांनी कमी होऊन 70,122 रुपये प्रति किलो झाले. काल चांदीचा दर चांगला वाढला होता.

सोन्याचे नवीन दर दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती मंगळवारी प्रति 10 ग्रॅम  47,702 रुपये झाली आहे. ट्रेडिंग सेशनच्या आधी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 48,182 रुपयांवर बंद झाले होते.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,847 डॉलरवर गेली. चांदीचे नवीन दर दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीच्या किंमती मंगळवारी जोरात घसरल्या.

आता त्याचे दर 3,097 रुपयांनी घसरून 70,122 रुपये प्रति किलो झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज चांदीची किंमत 27.50 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सोने-चांदीवरील पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली.

मात्र, त्यांनी सोने-चांदीवर अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावणार असल्याचंदेखील सांगितलं. अर्थमंत्र्यांनी एकीकडे कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली तर दुसरीकडे सोन्यावर अडीच टक्क्याचा सेस लावणार असल्याचं सांगितलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment