भारतासमोर कॅन्सरचं मोठं संकट ! प्रत्येक ५ पैकी ३ रुग्णांचा मृत्यू

Published on -

भारतात कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पाचपैकी तीन रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका नव्या अभ्यासातून समोर आले आहेत. ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साऊथईस्ट एशिया’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारताचा कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर अमेरिका आणि चीनच्या तुलनेत अधिक आहे.भारतात कर्करोगासंबंधी वाढती प्रकरणे आणि मृत्यूदर हा एक गंभीर विषय बनत आहे. यासाठी आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा आणि जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.

भारताला मोठे आव्हान : दरवर्षी २% वाढीचा अंदाज

संशोधकांच्या मते, भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वयाच्या वाढीसोबतच कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये दरवर्षी २ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दशकांत कर्करोगाशी संबंधित मृत्यू भारतासाठी मोठे आरोग्यविषयक आव्हान ठरू शकते.

जागतिक तुलनेत भारतातील स्थिती – अहवालानुसार, कर्करोगाचे निदान झाल्यानंतर –
भारतामध्ये प्रत्येक ५ रुग्णांपैकी ३ जणांचा मृत्यू होतो.
अमेरिकेत हे प्रमाण ४ पैकी १ इतके आहे.
चीनमध्ये दोन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होतो.

भारतात कर्करोगाचा वाढता धोका

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) च्या अभ्यासानुसार, चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा कर्करोगाबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावर कर्करोगाने होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी १०% हून अधिक मृत्यू भारतात होतात.

भविष्यात अधिक गंभीर परिस्थिती

ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्व्हेटरी (GLOBOCAN 2022) आणि ग्लोबल हेल्थ ऑब्जर्व्हेटरीच्या डेटावर आधारित या अभ्यासातून भारतातील कर्करोगाच्या सद्यस्थिती आणि भविष्यातील संभाव्य धोके यांचे व्यापक विश्लेषण करण्यात आले आहे.

समस्या कमी करण्यासाठी काय करायला हवे?

लवकर निदान आणि उपचार उपलब्ध होणे गरजेचे, कर्करोग प्रतिबंधक उपायांचा अधिक प्रचार व प्रसार, तंबाखू, मद्यसेवन, आणि अशुद्ध आहार यावर नियंत्रण, जनजागृती आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरे वाढवणे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe