Indian Army Recruitment : तुम्ही देखील भारतीय सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता सैन्य भरती मेळाव्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या नवीन नियमांनुसार आता उमेदवारांना सैन्य भरती मेळाव्यात वर्षातून एकदाच अर्ज करता येणार आहे. दुसरा मोठा बदल म्हणजे आता सामायिक प्रवेश परीक्षा शारीरिक परीक्षेपूर्वी होणार आहे यामुळे आता जे एंट्रेंस परीक्षामध्ये उत्तीर्ण होतील ते फिजिकल टेस्टसाठी पात्र ठरणार आहे.
आधी काय नियम होता
पूर्वी सैन्य भरती मेळाव्यात नवीन नियम उलटे असायचे. उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आल्यानंतर त्यांची सामायिक प्रवेश चाचणी परीक्षा घेण्यात येत होत्या.

नवीन भरती प्रणाली काय आहे
पहिल्या टप्प्यात भरतीची अधिसूचना जारी केली जाईल, त्यानंतर ऑनलाइन नोंदणी केली जाईल, त्यानंतर प्रवेशपत्र जारी केले जाईल, सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल, निकाल जाहीर केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात प्रवेशपत्र येईल, बायोमेट्रिक पडताळणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि शारीरिक मोजमाप होईल. शेवटी वैद्यकीय परीक्षा आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.
नोंदणी केव्हा होईल ते जाणून घ्या
राजस्थानचे उपमहासंचालक (भरती) ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी माहिती दिली आहे की आता तरुण वर्षातून एकदा सैन्य भरतीसाठी अर्ज करतील. प्रथम प्रवेश परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी होईल. सैन्य भरतीच्या नोंदणीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 15 मार्चपर्यंत अर्ज करता येईल. 16 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू आहे.
हे पण वाचा :- Free Electricity : अरे वाह, आता संपूर्ण उन्हाळ्यात मिळणार फ्री वीज ! फक्त करा ‘हे’ काम