Indian Railways: आज आपल्या देशात दररोज करोडो नागरिक रेल्वेने प्रवास करता. याचा मुख्य कारण म्हणजे कमी किमतीमध्ये प्रवासांना जास्त सुविधा मिळतात. एकट्या मुंबई शहरात रेल्वे हजारो फेऱ्या मारते. यातच तुम्ही कधी विचार केला आहे का ? एक लीटर डिझेलमध्ये ट्रेन किती मायलेज देत असेल आणि किती किमी धावत असेल नाही ना तर आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. चला मग जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.
पॉवरनुसार ट्रेनचे मायलेज ठरवले जाते
देशात एकाच वेळी अनेक रेल्वे धावत असतात. यामुळे ट्रेन कोणत्या मार्गावर धावत आहे आणि त्या मार्गावर किती रहदारी आहे यानुसार आणि डिझेल इंजिनच्या पॉवरनुसार ट्रेनचे मायलेज ठरवले जाते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या 24 कोच असलेल्या सुपरफास्ट ट्रेनचे इंजिनला 1 किमी मायलेज देण्यासाठी 6 लिटर डिझेल लागतो आणि 12 कोच असलेल्या पॅसेंजर ट्रेनचे इंजिनला 1 किमी मायलेज देण्यासाठी देखील 6 लिटर डिझेल लागतो.
तर दुसरीकडे 12 कोच असलेल्या एक्स्प्रेस ट्रेनचे इंजिनला 1 किमी मायलेज देण्यासाठी 4.5 लिटर डिझेल लागतो. आम्ही तुम्हाला सांगतो जर पॅसेंजर ट्रेन जास्त थांबल्या तर त्यांचे मायलेज कमी होते तर सुपरफास्ट ट्रेन जास्त काळ थांबत नसल्यामुळे त्यांचे मायलेज पॅसेंजर ट्रेनच्या तुलनेत जास्त असते.
याच बरोबर हे देखील जाणून घ्या डिझेल इंजिन ट्रेनचे मायलेज प्रति तासाच्या आधारावर मोजले जाते आणि ट्रेनचे मायलेज त्या ट्रेनमध्ये बसवलेल्या कोचच्या संख्येवर असतो.
हे पण वाचा :- Summer Business Idea : उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! दरमहा होणार 40 हजारांची कमाई ; जाणून घ्या कसं