अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-देशातील बड्या उद्योगपतींपैकी एक आनंद महिंद्रा हे देखील मोठे दिलदार मानले जातात. जे लोक काही खास गोष्टी करतात त्यांना मोठे बक्षिसे देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी असे म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकणार्या 6 स्टार क्रिकेटर्सना ते THAR-SUV कार गिफ्ट देणार आहेत.
आनंद महिंद्रा थार-एसयूव्ही कार ज्या खेळाडूंना देणार आहेत त्या 6 खेळाडूंमध्ये शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.
आनंद महिंद्राने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सहा युवा खेळाडूंनी आपल्या पदार्पणातच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ऐतिहासिक बनविली.
त्यांनी येत्या तरुण पिढीसाठी एक आदर्श ठेवला आहे की तेदेखील त्यांची स्वप्ने सत्यात उतरवू शकतील. ‘ दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “ही तरुण खेळाडूंची उदयाची कहाणी आहे.
चांगले काम करण्यासाठी त्याने कठीण परिस्थितीवर विजय मिळविला आहे आणि तरुण पिढीला एक सकारात्मक प्रेरणा दिली आहे. त्यांना ही नवीन THAR एसयूव्ही भेट देऊन मला आनंद झाला.
मोहम्मद सिराज, शार्दुल, शुभमन, नटराजन, नवदीप आणि वॉशिंग्टन यांनी शानदार प्रदर्शन केले. त्यांनी स्वत: वर विश्वास ठेवून इतिहास रचला. ”
या 6 खेळाडूंचे टेस्ट सिरीजमधील प्रदर्शन
खेळाडू खेळलेल्या टेस्ट प्रदर्शन
- मोहम्मद सिराज 3 13 विकेट
- शार्दुल ठाकुर 1 07 विकेट
- टी नटराजन 1 03
- विकेट वॉशिंगटन सुंदर 1 04
- विकेट नवदीप सैनी 2 04
- विकेट शुभमन गिल 3 259 रन
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved