Share Market Update : आजकाल प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत आहे. प्रत्येकाच्या गुंतवणुकीमागील एकच उद्देश आहे की पैसे गुंतवणूक करून त्याबदल्यात अधिक पैसे कमावणे. मात्र आजकाल अनेक तरुण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करत आहेत.
शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. कारण काही बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. काही महिन्यातच बँकेचे शेअर्स झपाट्याने वाढून गुंतवलेले पैसे डबल झाले आहेत.
पण काही वेळा शेअर मार्केटमधील गुंतवणूक धोक्याची देखील ठरू शकते. यामध्ये तुमचे पैसे देखील जाऊ शकतात. पण जर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केली तर ती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
आज तुम्हाला UCO बँकेच्या शेअर्सबद्दल सांगत आहोत. गेल्या काही महिन्यांपासून या बँकेच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी दिसून येत आहे. अहवालानुसार, UCO बँकेच्या स्टॉकने गेल्या 4 महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांना 110% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. अत्यंत कमी कालावधीत हा खरोखरच उच्च परतावा आहे.
UCO बँकेचा शेअर 20 ऑक्टोबर 2022 रोजी BSC वर 12.17 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. दुसरीकडे, 20 फेब्रुवारी 2023 रोजी बँकेच्या शेअरने BSE वर 25.45 रुपयांच्या पातळीवर गेला होता.
UCO बँकेने गेल्या 8 महिन्यांत 142% परतावा दिला आहे. शिवाय, गेल्या 6 महिन्यांत बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 123% वाढ झाली आहे. शेर इंडियाचे उपाध्यक्ष म्हणतात की, या आर्थिक निकालानंतर यूको बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.