अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट मॅचचे 31 सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता.
याच सीझनचे उर्वरित सामने याच वर्षी होणार असल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं होतं. अखेर आज आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
आयपीएलच्या १४ व्या पर्वातील उर्वरित सामने यूएईमध्ये होणार असून १९ सप्टेंबरपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
याच दिवशी दसरा सण देखील आहे. आयपीएलच्या उर्वरित ३१ मॅचेच दुबई, शारजाह आणि अबु धाबी येथे खेळल्या जातील.
आय़पीएल १४ चा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होईल असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं. आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंचा मुद्दा अत्यंत महत्वाचा असणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यंदा आयपीएलमधून अनेक परदेशी खेळाडूंनी स्पर्धा स्थगित होण्याआधीच माघार घेतली होती.
त्यामुळे उर्वरित आयपीएल खेळविण्याआधी संबंधित क्रिकेट बोर्डांकडून खेळाडूंना यावेळी परवानगी दिली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
पण परदेशी खेळाडूंबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असा विश्वास बीसीसीआयनं व्यक्त केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम