Jio Cinema Subscription Plan : Jio Cinema ने लॉन्च केला सब्सक्रिप्शन प्लॅन, आता स्वस्तात पाहता येणार वर्षभर ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपट

Published on -

Jio Cinema Subscription Plan : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनीने जिओ सिनेमाचा सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च केला आहे. सध्या जिओ ग्राहकांना जिओ सिनेमाचा मोफत लाभ दिला जात आहे. Jio Cinema चे सदस्यत्व घेणाऱ्या ग्राहकांना एका वर्षासाठी ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपटांचा आनंद घेता येईल.

सध्या जिओ ग्राहकांना कंपनीकडून अनेक सुविधांचा मोफत लाभ दिला जात आहे. रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा मोफत लाभ देण्यात येत आहे.

जिओ कंपनीकडून त्यांच्या या सबस्क्रिप्शन प्लॅनला Jio Cinema Premium असे नाव दिले आहे. ग्राहकांना १ वर्षाचा सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करायचा असेल तर त्यासाठी 999 रुपये खर्च करावे लागतील.

जिओ सिनेमाचे सदस्य एक्सक्लूसिव कॉन्टेंटचा आनंद घेऊ शकतील

जिओ सिनेमाच्या सबस्क्रिप्शन प्लॅनची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. या सबस्क्रिप्शन प्लॅनचा आनंद ग्राहक कोणत्याही डिव्हाइसवर घेऊ शकतात. जिओ सिनेमाचा हा सबस्क्रिप्शन प्लॅन हॉलिवूड चित्रपट पाहण्याची संधी देत आहे. तसेच एक्सक्लूसिव कॉन्टेंट पाहण्याचा आनंद देत आहे.

जे नवीन चित्रपट जिओ सिनेमावर पाहता येतील ते चित्रपट इतर कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही देखील जिओ सिनेमा सबस्क्रिप्शन घेऊन त्याचा आनंद घेऊ शकता.

मुकेश अंबानी यांचे वायकॉम 18 आणि वॉर्नर ब्रदर्स. यांच्यामध्ये करार

काही दिवसांपूर्वीच Jio ने Jio Cinema च्या सबस्क्रिप्शन प्लॅनची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते की त्यांची मनोरंजन कंपनी वायाकॉम 18 आणि अमेरिकेची मनोरंजन कंपनी वॉर्नर ब्रदर्स. यांच्यामधील डील अंतर्गत जिओ सिनेमाचे सदस्य वॉर्नर ब्रदर्स. चे नवीनतम चित्रपट पाहण्यास सक्षम असतील. HBO ही Warner Bros ची उपकंपनी आहे.

जिओचे ग्राहक मोफत आयपीएल पाहत आहेत

सध्या जिओ ग्राहक देशातील सर्वात मोठ्या क्रिकेटचा रणसंग्राम आयपीएल जिओ सिनेमावर मोफत पाहत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आयपीएल पाहण्यासाठी कोणतेही सबस्क्रिप्शन खरेदी करावे लागत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News