Jio recharge : सध्याच्या काळात रिलायन्स जिओकडे सर्वात जास्त ग्राहकवर्ग आहे. याचे कारणही तसेच आहे. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जिओकडे ग्राहकांची संख्या जास्त आहे. कारण आहे कंपनीचे रिचार्ज प्लॅन. जिओकडून ग्राहकांना सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन दिले जात आहेत.
हे रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारे तर असतातच परंतू कंपनी यात इतर कंपन्यांच्या रिचार्जच्या तुलनेत जास्त फायदे देत असते, त्यामुळे ही कंपनी ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे.
तसेच कंपनीकडून दिवसेंदिवस ग्राहकांना अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना भन्नाट रिचार्ज प्लॅन मिळत आहेत. तसेच ग्राहकांचे पैसे देखील वाचत आहेत.
कंपनीच्या अशाच एका प्लॅनची सध्या चर्चा सुरु आहे. ज्याची किंमत फक्त 152 आहे. काय आहे कंपनीचा हा प्लॅन? यात ग्राहकांना कोणते फायदे मिळतात? जाणून घेऊया सविस्तर….
समजा तुम्ही इंटरनेट कमी वापरता आणि जास्त कॉल करत असाल तर कंपनीचा हा रिचार्जे प्लॅन तुमच्यासाठीच आहे. कारण तुम्हाला आता 152 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन संपूर्ण महिना डेटा आणि फ्री कॉलिंगच्या तणावातून मुक्त करेल.
जाणून घ्या संपूर्ण रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑफर्स मिळत आहेत. जर तुम्ही डेटाचा जास्त वापर करत नसाल तर तुम्ही या प्लानचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला एकूण 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच तुम्हाला नाईट वर्कसाठी 500 MB डेटा मिळतो, म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 14 GB डेटा वापरू शकता.
दररोज मिळतात 300 एसएमएस
या रिचार्ज प्लॅनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळत आहे. यात तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर 28 दिवस अनलिमिटेड बोलू शकता.
तसेच तुम्हाला यात दररोज 300 SMS दिले जात आहेत. इतकेच नाही तर कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला इतर प्लॅनप्रमाणे जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटीचे सबस्क्रिप्शनही देण्यात येत आहे.