Free OTT Recharge Plans : जिओचा भन्नाट प्लॅन ! Netflix, Amazon आणि Disney + Hotstar चालणार वर्षानुवर्षे मोफत…

Ahilyanagarlive24 office
Published:

Free OTT Recharge Plans : आजकाल तरुणांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्सची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे अनेकजण स्मार्टफोनवरती नवीन चित्रपट, वेब सिरीज आणि इतर शो पाहत असतात. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात.

मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्म तुम्ही मोफत पाहू शकता. टेलिकॉम कंपनी जिओने भन्नाट प्लॅन आणला आहे. त्यामध्ये अनेक फायदे देण्यात येत आहेत. यामध्ये Netflix, Amazon आणि Disney + Hotstar मोफत पाहता येणार आहे.

जिओने एक भन्नाट प्लॅन सादर केला आहे. तो रिचार्ज प्लॅन वापरून तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म मोफत मिळवू शकता. मात्र या प्लॅनमध्ये जिओ कंपनी अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि डेटाचा लाभच नाही तर ओटीटी प्लॅटफॉम फ्रीमध्ये देत आहे.

मोफत OTT सबस्क्रिप्शन रिचार्ज योजना

जिओ कंपनीकडून रिचार्ज प्लॅन 399 रुपयांमध्ये मोफत OTT फायदे दिले जात आहेत. कंपनीकडून पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही 399 रुपयांचे प्लान देण्यात येत आहेत. या दोन्हीमध्ये Netflix, Amazon आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करते.

जिओ प्रीपेड योजना

जिओकडे 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Jio 399 प्रीपेड प्लॅन) देखील आहे, ज्याची वैधता 56 दिवस आहे, ज्यामध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

याशिवाय प्लॅनमध्ये युजर्सना जिओ अॅप्सचा मोफत प्रवेशही दिला जात आहे. या प्लॅनसह, Jio Apps व्यतिरिक्त, मोफत Netflix, Amazon आणि Disney Plus Hoststar चे सदस्यत्व 1 वर्षासाठी उपलब्ध आहे.

जिओ पोस्टपेड योजना

Jio च्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये (Jio 399 पोस्टपेड प्लॅन), 75 GB डेटा एका महिन्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. एवढा डेटा तुम्ही संपूर्ण महिन्यात कोणत्याही दिवसासाठी वापरू शकता.

Jio या प्लानमध्ये 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा देत आहे. जर डेटा संपला तर कंपनी 1 जीबी डेटासाठी 10 रुपये आकारते. Jio अॅप्स व्यतिरिक्त, 1 वर्षासाठी मोफत Netflix, Amazon आणि Disney Plus सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe