मोबाईल रिचार्ज प्रमाणेचं आता विजेसाठी देखील करावे लागणार महिन्याचा रिचार्ज, महावितरण बसवणार प्रीपेड मीटर, कसे करणार काम ?

Ahmednagarlive24 office
Published:

Prepaid Meter Scheme : घरगुती वीज ग्राहकांना आता वीज वापरण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागणार आहे. मोबाईल प्रमाणेच वीज वापरासाठी रिचार्ज करावा लागणार असून रिचार्ज केल्यानंतरच घरगुती वीज ग्राहकांना विज उपलब्ध होणार आहे.

यामुळे, घरगुती ग्राहकांकडे थकत असलेली विजेची थकबाकी आता वसूल करण्याची महावितरणची झंझट आता कायमची संपणार आहे. खरे तर सध्या स्थितीला महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात आधी वीज वापरले जाते आणि त्यानंतर वीजबिलाची वसुली होत असते.

यामुळे मात्र अनेकदा महावितरण आणि ग्राहकांमध्ये वाद विवाद होतात. ग्राहकांच्या माध्यमातून महावितरण कडून अधिकचे वीज बिल वसूल केले जात असल्याचा आरोप केला जातो. वापरलेले विजेचे युनिट आणि त्यावर आकारलेला दर यावरून नेहमीच ग्राहक आणि महावितरण आमने सामने होत असते.

आता मात्र ही सर्व गोष्ट कालबाह्य होणार असे चित्र तयार होत आहे. कारण की आता घरगुती वीज ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर बसवले जाणार आहेत. या मीटरसाठी आधी रिचार्ज करावा लागणार आहे आणि त्यानंतरच घरगुती वीज ग्राहकांना लाईट उपलब्ध होणार आहे. म्हणजेच मोबाईल रिचार्ज प्रमाणे जेवढा रिचार्ज असेल तेवढा वापर वीज ग्राहकांना करता येणार आहे.

ज्याप्रमाणे आपण मोबाईल रिचार्जसाठी प्लॅन सिलेक्ट करून मोबाईल रिचार्ज करतो तसेच या प्रीपेड मीटर साठी देखील प्लॅन सिलेक्ट करून रिचार्ज करावा लागणार आहे. यामुळे थकबाकीचा मोठा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या सध्याच्या मीटर बाबत अनेक प्रश्न आहेत.

अनेकांच्या माध्यमातून सध्याच्या मीटरवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्या स्थितीला वापरलेल्या विजेचे रीडिंग घेतले जाते आणि त्यानंतर विज बिल ग्राहकांकडे पाठवले जाते. मात्र रीडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होते आणि ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जाते असा आरोप केला जातो.

परंतु आता प्रीपेड मीटर बसवले जाणार असल्याने या सर्व शंकेचे निरसन देखील होणार आहे. तथापि या प्रीपेड मीटरच्या चर्चा गेल्या पाच ते सात वर्षांपासून सुरू आहेत. याबाबत मात्र अजूनही स्पष्टोक्ती येऊ शकलेली नाही. आधी खाजगी कंपन्या अशा प्रकारचे मीटर बसवतील आणि त्यानंतर सरकारी कंपन्या हे मीटर ग्राहकांना उपलब्ध करून देतील अशी माहिती समोर आली होती.

मात्र याबाबतही अद्याप काहींचं ठरलेलं नाही. अशातच आता पुन्हा केंद्र शासनाच्या माध्यमातून याबाबतची नवीन घोषणा करण्यात आली आहे. घरगुती वीज ग्राहकांना आधी स्मार्ट मीटर दिले जाणार आहे. एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले प्रीपेड मीटरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. परंतु याची अंमलबजावणी नेमकी केव्हा होणार याबाबत कोणतीच माहिती समोर येत नाहीये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe