अहमदनगर :- शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या शहीद कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘कबीर सिंह’च्या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मोठ्या कालावधीनंतर ‘कबीर सिंह’च्या रुपाने शाहीदने एक सुपरहीट चित्रपट दिला असून हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.
या वर्षातला सर्वात जलद 100 कोटी रुपये कमावणारा ‘कबीर सिंह’ दुसरा चित्रपट ठरला आहे.
अहमदनगर Live ला मिळालेल्या माहितीनुसार कबीर सिंहने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी ) 20.21 कोटी रुपयांची कमाई करत शानदार ओपनिंग मिळवली.
त्यानंतर शनिवारी आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत अजून वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाने शनिवारी 22.71 कोटी आणि रविवारी 27.91 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
विकेण्डनंतरही चित्रपटाची घौडदौड सुरुच असून सोमवारी चित्रपटाने 17.54 कोटी आणि मंगळवारी 16.53 कोटी रुपयांची कमाई केली.
विशेष म्वहणजे आवघ्या पाच दिवसात ‘कबीर सिंह’ने 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. पाच दिवसात मिळून ‘कबीर..’ने 104.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आठवड्यातील पुढील पाच दिवसात चित्रपट जोरदार कमाई करण्याची शक्यता आहे.
Don’t forget to like, share, and follow Ahmednagarlive24 On Social Media Stay tuned with us.
Get Breaking News Updates Of #Ahmednagar
Visit Website – http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
Subscribe to on YouTube Channel – http://bit.ly/YT-Ahmednagarlive24
Like us on Facebook – http://bit.ly/FB-Ahmednagarlive24
Follow us on Twitter – http://bit.ly/TW–Ahmednagarlive24
Follow us on Instagram – http://bit.ly/IG-Ahmednagarlive24