Kedarnath Yatra Tips : तुम्हीही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये केदारनाथ धाम यात्रेसाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. कारण केदारनाथला जाण्यासाठी आरोग्यच्या संबंधित काही चाचण्या करणे आवश्यक आहे. कारण केदारनाथ धाम हे उंचीवरील ठिकाण असल्याने अनेकांना या ठिकाणी गेल्यानंतर समस्या निर्माण होत असतात.
केदारनाथ धामचे दरवाजे २५ एप्रिल रोजी उघडण्यात आले आहेत. या ठिकाणी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडताना हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तसेच या ठिकाणी अजूनही बर्फ पडत असल्याने केदारनाथ यात्रा करण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो.
केदारनाथ धामला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. यंदाही लाखो भाविकांनी आणि पर्यटकांनी केदारनाथला जाण्यासाठी आगोदरच नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदाही लाखो पर्यटक आणि भाविक केदारनाथला जाणार आहेत.
भगवान शंकराचे भव्य आणि प्राचीन मंदिर पाहण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. केदारनाथला जाण्यासाठी उंच टेकड्यांवरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असते. ऑक्सिजनची कमतरता असल्याने हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे केदारनाथला जाण्यापूर्वी अनेक चाचण्या करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हालाही या ठिकाणी गेल्यानंतर समस्या निर्माण होऊ शकतात. प्रवासात खबरदारी घेणे देखील गेजेचे आहे.
ही चाचणी करा
तुम्ही जसे उंचीवरील ठिकाणी जात असता तसे त्या ठिकाणी हृदयविकाराचा धोका वाढत असतो. कारण या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असते. त्यामुळे केदारनाथला जाताना हृदयविकार असणाऱ्या रुग्णांची प्रकृती खालावू शकते. त्यामुळे खालील चाचण्या आवश्य करून घ्या.
लिपिड प्रोफाइल चाचणी
ट्रेडमिल चाचणी
ईसीजी
कोरोनरी अँजिओग्राम
ही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या
अचानक भरपूर घाम येणे
छाती आणि डावा हात एकत्र दुखणे
श्वास लागणे आणि छातीत घट्टपणा
अचानक जबडा आणि मान दुखणे