पोलिसांच्या सूचनेकडे मजुरांचे दुर्लक्ष ; १०० मजुरांवर ओढवला मृत्यू तर तब्ब्ल ४०० मजूर…

Mahesh Waghmare
Published:

१५ जानेवारी २०२५ जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेमधील एका सोन्याच्या खाणीत अडकलेल्या तब्ब्ल १०० मजुरांवर मृत्यू ओढावल्याची बातमी मंगळवारी समोर आली.मागील दोन महिन्यांपासून जवळपास ४०० मजूर खाणीत खोदकामासाठी आले होते.

पण,त्यांना नंतर बाहेर पडण्याचा रस्ताच सापडला नसल्यामुळे ते मध्येच अडकले.गेल्या चार दिवसांपासून अन्न-पाणी मिळाले नसल्यामुळे जवळपास १०० मजुरांवर काळाने घाला घातला आहे.तर खाणीतून २६ मजुरांना सहीसलामत जिवंत बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

दक्षिण आफ्रिकेमधील एका बंद पडलेल्या सोन्याच्या खाणीत काही मजुरांनी पुन्हा एकदा अवैधरीत्या खोदकाम करायला सुरुवात केली होती.मागच्या तीन ते चार महिन्यांपासून येथे खोदकाम चालू होते.यावेळी कोणत्याही सुरक्षेचा विचार न करता ४०० मजुरांनी खाणीत खोलवर जाण्याचे धाडस केले.यादरम्यान १०० जण मध्येच अडकले व त्यांचा मृत्यू झाला,अशी माहिती खाण संबंधित सामाजिक संस्था ‘मायनिंग अफेक्टेड कम्युनिटीज युनायटेड इन अॅक्शन’चे (मकुआ) प्रवक्ते सबेलो मंगुनी यांनी दिली.

या प्रकारानंतर युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.त्यासाठी एका विशेष बचाव पथकाला खाणीत पाठवण्यात आले आहे.यावेळी १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत.खाणीत अडकल्यानंतर मजुरांना अन्न-पाणी मिळाले नसल्यामुळे उपासमारीमुळे त्यांना प्राण गमवावा लागला आहे.मात्र मदतकार्य चालू असतानाच अनेकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

यापैकी एका मजुराकडे मोबाइल सापडला आहे त्यात खाणीत अडकल्याचे दोन व्हिडिओ होते.या व्हिडिओत डजनभर मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत दिसत आहेत,असे मंगुनी सांगितले.दरम्यान,या सोन्याच्या खाणीला पोलिसांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात टाळे ठोकले होते.त्याचवेळेस सर्व मजुरांना बाहेर येण्यास सांगितले गेले होते.मात्र अटक होण्याच्या भीतीमुळे असंख्य मजुरांनी खाणीतच मुक्काम ठोकला होता त्या दिवसापासून तेव्हापासून ते तिथेच अडकले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe