Laptop under 10K : तुम्हीही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण कमी पैशामध्ये दमदार लॅपटॉप मिळत आहेत. फ्लिपकार्टवर ही ऑफर लागली आहे. या ऑफरचा तुम्हीही फायदा घेऊ शकता.
बाजारात लॅपटॉप खरेदी करायला गेले तर त्याची किंमत ३० हजारांपासून पुढे आहे. त्यामुळे ते अनेकांना घेणे परवडत नाही. ज्यांचे बजेट कमी आहे अशा लोकांसाठी ही मस्त ऑफर आहे.
फ्लिपकार्टवर २० हजारांपासून कमी किमतीमध्ये सध्या लॅपटॉप उपलब्ध आहेत. तसेच फ्लिपकार्टद्वारे दिल्या जात असलेल्या ऑफर वापरल्यानंतर तोच लॅपटॉप तुम्हाला १० हजारांपेक्षा अधिक कमी किमतीमध्ये मिळू शकतो.
जाणून घ्या ऑफर
Asus Chromebook Celeron Dual Core नावाचा लॅपटॉप फ्लिपकार्टवर स्वस्तात उपलब्ध आहे. यात 15.6 इंचाचा डिस्प्ले आहे. लॅपटॉपची मूळ किंमत 25,990 रुपये आहे परंतु त्याच्या किमतीवर 30 टक्के सूट दिली जात आहे. यानंतर लॅपटॉपची किंमत 17,990 रुपये होईल. मात्र, ऑफर लागू केल्यानंतर लॅपटॉपची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.
बँक ऑफर
या लॅपटॉपवर Flipkart तर्फे बँक ऑफर दिली जात आहे. बँक ऑफर अंतर्गत, तुम्ही फेडरल बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला 10% ची सवलत मिळू शकते म्हणजेच 1,250 पर्यंत. HSBC क्रेडिट कार्ड्स आणि EMI व्यवहारांवरही फ्लॅट 10% सूट आहे. अशाप्रकारे, तुम्ही रु.17,990 मध्ये उपलब्ध असलेला लॅपटॉप रु.1250 च्या सूटसह खरेदी करू शकाल.
एक्सचेंज ऑफर
जर तुम्ही तुमचा सुव्यवस्थित असलेला जुना लॅपटॉप बदली केला तर त्यामध्ये तुम्हाला आणखी सूट मिळेल. जर हा लॅपटॉप चांगला असेल तर नवीन लॅपटॉपवर 12,300 रुपयांपर्यंत सूट मिळेल. म्हणजेच नवीन लॅपटॉप फक्त 4,440 रुपयांमध्ये मिळेल.