Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. तसीच वैवाहिक जीवनात कसे सुखी राहता येईल याबद्दलचीही अनेक धोरणे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आली आहेत. त्या धोरणांचा तुमच्याही वैवाहिक जीवनात सकारात्मक प्रभाव पडू शकतो.
वैवाहिक जीवनात तुम्हालाही सुखी संसार करायचा असेल तर तुम्हीही चाणक्य नीती धोरणांचा अवलंब करू शकता. आचार्य चाणक्य यांनी पती पत्नीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही नक्कीच वैवाहिक जीवनात सुखी संसार करू शकता.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार पतीने पत्नीचे संरक्षण करणे हे पहिले कर्तव्य आहे. तसेच पती संकटात असताना पत्नीने त्याची साथ देणे गरजेचे आहे. असे केल्याने नक्की तुम्ही वैवाहिक जीवनात सुखी व्हाल.
वैवाहिक जीवनात पती-पत्नीचा एकमेकांवर समान अधिकार असतो. चाणक्य म्हणतात की जेव्हा पती नाराज किंवा दुःखी असतो तेव्हा प्रेमाच्या मदतीने त्याला आनंद देणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. पत्नीने पतीवर अपार प्रेमाचा केले पाहिजे. असे केल्याने काही वेळा पती-पत्नीच्या नात्यात जवळीक वाढते.
चाणक्य धोरणानुसार पती-पत्नीने एकमेकांप्रती प्रेम, समर्पण आणि त्याग दाखवण्यास कधीही लाज वाटू नये. जर कोणी असे केले तर त्यांचे नाते दूरता वाढत जाते. त्यामुळे कोणत्याही कामाची लाज वाटू देऊ नये.
वैवाहिक जीवनात पती पत्नीने एकमेकांशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे. पती पत्नीने एकमेकांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीच्या प्रेमात पडू नये. अन्यथा नटे तुटण्यास वेळ लागणार नाही.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार बाह्य सौंदर्य पाहून जीवनसाथी कधीही निवडू नये. माणसाला नेहमी त्याच्या गुणांवरून ओळखले पाहिजे कारण एक सुसंस्कृत स्त्री पतीसह संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात आनंद आणते. त्यामुळे स्त्रीच्या बाह्य सौंदर्य पाहून प्रेम करणे चुकीचे ठरू शकते.