PPF : गुंतवणूक कमी फायदा जास्त! 417 रुपये गुंतवा आणि मिळवा करोडोंचा परतावा; जाणून घ्या योजना…

Ahmednagarlive24 office
Published:

PPF : आजकाल प्रत्येकजण कुठे ना कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. मात्र काहींना कुठे गुंतवणूक करायची हे माहिती नसते. तसेच अनेकजण गुंतवणूक करतात मात्र त्या गुंतवणुकीतून जास्त फायदा मिळत नाही. मात्र आजकाल अशा योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवू शकता.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ मध्ये तुम्ही गुंतवणूक करून पुढील भविष्यासाठी चांगला फायदा मिळवू शकता. पीपीएफ ही एक दीर्घकालीन योजना आहे. PPF चा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे.

तुम्ही इतर योजनेत गुंतवणूक करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा मिळणार नाही, मात्र PPF मधील गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनेवर जास्त व्याजदर दिले जात आहे.

या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता. खाते उघडल्यानंतर तुम्ही पीपीएफ मधील गुंतवणूक सुरु करू शकता.

केंद्राने व्याज बदललेले नाही

केंद्र सरकारकडून प्रत्येक ३ महिन्याला पीपीएफ योजनेवरील व्याजदरात बदल केला जातो. मात्र नवीन वर्षात केंद्र सरकारकडून या योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पीपीएफ लघु बचत योजनेवर ७.१ टक्के व्याजदर दिले जात आहे.

एनआरआय पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकत नाही

केंद्र सरकारच्या या योजनेत फक्त भारतीय नागरिकत्व असलेले लोकच गुंतवणूक करू शकतात. भारतीय नागरिकांशिवाय इतर कोणीही यामध्ये गुंतवणूक करू शकता नाही. दरवर्षी तुम्ही PPF मध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता.

जर तुम्हाला निवृत्तीपर्यंत करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला 25 वर्षे दरमहा 12500 रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे, ही रक्कम वर्षभरात एकूण 1.50 लाख रुपये होईल.

जेव्हा तुम्ही हे पैसे २५ वर्षांनंतर काढता तेव्हा ते १.०३ कोटी रुपये होईल. या 25 वर्षांच्या गुंतवणुकीत 37,50,000 रुपये मुद्दल आणि 7.1 टक्के दराने व्याज 65,58,015 रुपये असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe