Long Weekend Destination:- अनेक जणांना काही वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने किंवा वीकेंडमध्ये फिरायला जाण्याची आवड असते व अशी व्यक्ती अनेक ठिकाणी फिरायला जाण्याची ट्रीप प्लान करत असतात. कधी कधी या ट्रिप मित्रांसमवेत किंवा कधीकधी कुटुंबासमवेत देखील आयोजित केल्या जातात.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे भारताचा विचार केला तर भारतामध्ये विविधतेत एकता असून ही विविधता तुम्हाला सणांच्या बाबतीत देखील दिसून येते. प्रत्येक सणाला भारतामध्ये नावांपासून तर त्या ठिकाणी सण साजरा करण्याच्या पद्धतीत देखील वेगळेपण दिसून येते. हीच पद्धत आपल्याला मकर संक्रांतीची देखील दिसते.

तुमचा देखील या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने कुठे फिरायला जायचा प्लान असेल तर तुम्ही साउथ मधील म्हणजेच दक्षिण भारतातील काही सुंदर ठिकाणी भेट देऊ शकतात व महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणी साजरा केला जाणारा मकर संक्रांतीचा सण व त्या ठिकाणच्या स्थानिक चालरिती व परंपरा तुम्हाला जवळून पाहायला मिळतील. म्हणूनच आपण या लेखात अशाच काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेणार आहोत.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने भारतातील या ठिकाणांना द्या भेट
1- हम्पी– हम्पी हे ठिकाण कर्नाटक राज्यात असून या ठिकाणी विजयनगर साम्राज्याचे अवशेष असून ते एक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक मंदिर तसेच विजयनगर साम्राज्याचे अवशेष व त्याकाळच्या प्राचीन कलाकृती पाहण्याची अनोखी संधी मिळू शकते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मकर संक्रातीच्या कालावधीमध्ये हम्पी या ठिकाणी हम्पी उत्सव साजरा केला जातो व यामध्ये नृत्य तसेच विविध कला व संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे तुम्ही हम्पी या ठिकाणी जाऊन हम्पी उत्सवाचा आनंद घेऊ शकतात.

2- कुर्ग– हे ठिकाण देखील कर्नाटकमध्ये असून याला डोंगराची राणी म्हणून ओळखले जाते. कुर्ग येथे कॉफीचे मळे आणि हिरवीगार घनदाट जंगले तसेच मैदान असून त्या ठिकाणचे खूप सुंदर दृश्य पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि वाइल्ड लाईफ सफारीचा देखील आनंद घेऊ शकतात.
कुर्गचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मकर संक्रातीच्या वेळेला पोंगल हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोंगलच्या वेळी या ठिकाणचे लोक रंगीबेरंगी कपडे परिधान करतात व त्या ठिकाणच्या पारंपारिक नृत्याचा आविष्कार देखील साजरा करतात.

3- कोवलम– हे ठिकाण केरळमध्ये असून समुद्रकिनाऱ्यासाठी खूप प्रसिद्ध असलेले हे एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या ठिकाणी तुम्हाला निळे पाणी आणि नारळाच्या झाडांमध्ये फिरायला खूप मजा येऊ शकते.
कोवलमचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मकर संक्रांतीच्या कालावधीत विशू हा सण साजरा केला जातो. त्यामध्ये तेथील स्थानिक लोक नवनवीन कपडे घालतात व अनेक मंदिरांना देखील भेट देतात. या कालावधीत त्या ठिकाणी पारंपारिक जेवणाचा देखील आनंद त्या ठिकाणचे लोक घेत असतात.

4- मुन्नार– हे ठिकाण केरळ राज्यात असून ते निसर्ग सौंदर्यासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला हिरवेगार पर्वत तसेच चहाचा बागा आणि धबधब्यांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. मुन्नारचे वैशिष्ट्य म्हणजे मकर संक्रांतीच्या कालावधी ज्या ठिकाणी ओणम हा सण साजरा केला जातो. या सणाच्या वेळेस त्या ठिकाणचे स्थानिक लोक रंगीबेरंगी फुलांनी घरे सजवतात व पारंपारिक नृत्य देखील करतात.

5- अलाप्पुझा– हे ठिकाण देखील केरळ राज्यात असून त्याला व्हेनिस ऑफ बॅकवॉटर म्हणून देखील ओळखतात. या ठिकाणी तुम्ही हाऊस बोटमध्ये राहून केरळच्या सुंदर बॅकवॉटरचा आनंद घेऊ शकतात तसेच स्थानिक गावांना भेट देऊन त्या ठिकाणच्या स्थानिक चालरीती समजून घेऊ शकतात. विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या कालावधीत या ठिकाणी मंदिरांमध्ये विशेष प्रकारची पूजा आयोजित केली जाते व बोटीमधून मिरवणूक काढली जाते.

अशाप्रकारे तुम्ही दक्षिण भारतातील या ठिकाणांना भेट देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा करून आनंद द्विगुणित करू शकतात.













