7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाऊ शकते. नवीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे. DA वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे.
वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुरळीत चालावे यासाठी महागाई भत्ता वाढवण्यात येतो. वर्षातील पहिला महागाई भत्ता याच महिन्यात वाढवला जाणार असल्याची शक्यता आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ३१ जानेवारीला वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता अवघे १५ दिवस उरले आहेत. १५ दिवसानानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते.
आकडेवारीवरून हे स्पष्ट होईल की या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तुमचा पगार किती वाढणार आहे. एआयसीपीआय इंडेक्सचा डेटा दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रसिद्ध केला जातो.
पगार वाढणार
कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची आशा आहे. आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सरकार होळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू शकते. AICPI निर्देशांकाच्या आधारे, महागाई भत्ता किती टक्के वाढेल हे ठरवले जाते.
मागील आकडीवरीनुसार 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते
मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्याच्या आकडेवारी नुसार कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जर निर्देशांकात 1 अंकाची वाढ झाली तर डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
सध्या ३८ टक्के डीए मिळत आहे
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना ४१ टक्के दराने डीए मिळेल. जुलै 2022 मध्ये सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 38 टक्के वाढ झाली होती.
दरवाढ कधी जाहीर होणार?
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा मार्च महिन्यात होऊ शकते. 1 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळू शकते, म्हणजेच कर्मचाऱ्यांना 31 मार्चपासून वाढीव पगार मिळू शकतो, असे माध्यम सूत्रांनी सांगितले. यासोबतच जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे पैसे थकबाकीसह खात्यात येणार आहेत.