LPG Gas Smell : गॅस सिलेंडर चालू केल्यानंतर उग्र वास का येतो? जाणून घ्या त्यामागील शास्त्रीय कारण

LPG Gas Smell : भारत सरकारच्या अनेक योजनांमुळे भारतातील सर्व घरांमध्ये गॅस सिलिंडर पोहोचला आहे. पण गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पण गॅस सिलिंडरमुळे महिलांना स्वयंपाक बनवण्यात खूप मदत होत आहे.

गॅस सिलिंडरमुळे महिलांचे स्वयंपाक करण्याचे काम हलके झाले आहे. पण गॅस सिलिंडर अनेकदा धोकादायक बनतो. काही ठिकाणी गॅस सिलिंडरचा स्फोट होतो. गॅस सिलेंडरमध्ये ज्वलनशील लिक्विड असल्याने ते लगेच पेट घेते. त्यामुळे त्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे असते.

काही वेळा महिलांच्या किंवा घरातील इतर सदस्यांच्या चुकांमुळे चुकून गॅसची गळती होते. त्यामुळे मोठे अपघात होतात किंवा होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे अनेकदा गॅस सिलिंडर वापरताना काळजी घेण्यास सांगितले जाते.

स्वयंपाक किंवा गॅस सिलेंडरचे काम झाल्यानांतर गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करून ठेवावा. जर तुमच्या गॅसच्या पाईपमध्ये काही समस्या असतील तर तुम्ही तो पाईप लवकरात लवकर बदलावा.

घरांमध्ये वापरल्या जाणार्‍या एलपीजी सिलिंडरमध्ये भरलेला गॅस गंधहीन असतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. तरीही तो गळतो तेव्हा एक कुजलेला वास आजूबाजूला पसरतो.

दुर्गंधी कशामुळे येते?

अनेकदा घरातील वापरल्या जाणाऱ्या गॅसचा वास येतो. त्यामुळे घरात एक वेगळ्या प्रकारचा वास सुटतो. हा दुर्गंधी mercaptanनावाच्या रसायनाचा असतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गॅस सिलिंडरमध्ये mercaptan सोडले जाते.

लिक्विड पेट्रोलियम गॅस हा एक ज्वलनशील वायू आहे जो आगीच्या संपर्कात आल्यावर वेगाने जळू लागतो. गॅस गळतीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांच्या जीवास हानी देखील पोहचू शकते.

लोकांची सतर्कता वाढवण्याची गॅस सिलिंडरमध्ये mercaptan हा लिक्विड गॅसमध्ये सोडला जातो. गॅस गळती झाल्यास mercaptanच्या वासाने लोकांना समजते की गॅस गळती होत आहे. त्यामुळे लोक सतर्क होतात.

Mercaptainचा उग्र वास गॅस गळती दर्शवते

गॅस सिलिंडरमध्ये Mercaptain सोडल्याने उग्र वास तयार होतो आणि हा वास नागरिकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आजपर्यंत खूप मोठमोठे अपघात टळले आहेत. जर तुमच्या घरामध्ये गॅस सिलिंडरची गळती झाली तर सर्व ज्वलनशील वस्तू बंद करा आणि घराच्या खिडक्या आणि दरवाजे त्वरित उघडा. जेणेकरून गॅस घराबाहेर पडेल आणि अपघात टळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe