Ludo King : आज प्रत्येकाकडे एकापेक्षा एक स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये टाईमपास करण्यासाठी अनेक जण गेम खेळत असतात मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ? आपल्या फोनमध्ये असे अनेक Apps आहेत जे खूप डेटा वापरतात मात्र हे Apps कोणते आहे हे देखील आपल्याला माहिती नसते.
मात्र आता एका VPN service provider ने एक रिपोर्ट जारी केली आहे ज्यामध्ये काही मोबाइल गेम सांगण्यात आले आहेत जे सर्वाधिक डेटा वापरतात याच बरोबर हे Apps वापरकर्त्यांचा डेटा देखील कलेक्ट करतात.
अहवालात Call of Duty Mobile, Candy Crush Saga आणि Carrom Pool Disc Game गेम यासारख्या Apps चा समावेश आहे. गोपनीयतेच्या दृष्टीने हे गेमिंग Apps अतिशय धोकादायक मानले जातात. हे Apps 32 पैकी 17 जणांचा डेटा कलेक्ट करतात ज्यात फोटो-व्हिडिओ, कॉन्टैक्ट इंफॉर्मेशन, लोकेशन डेटा आणि कॉन्टैक्ट यांचा समावेश होतो.
रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की 50 पैकी 38 गेमिंग Apps असे आहेत जे यूजर्सचा डेटा थर्ड पार्टी जाहिरातींना शेअर करतात. या यादीत Ludo King आणि Subway Surfers अनुक्रमे 38 व्या आणि 07 व्या स्थानावर आहेत. अहवालात असे सांगण्यात आले आहे की 60 देशांमधील 50 सर्वात लोकप्रिय गेमिंग Apps सर्वात जास्त डेटा खातात.
लगेच डिलीट करा
तुमच्या फोनमध्ये कोणत्याही प्रकारचे मोबाइल गेम्स असतील तर तुम्हाला ते तुमच्या फोनवरून लगेच डिलीट करावे लागतील. यासोबतच मोबाईल गेमने तुम्हाला फोनसाठी कोणत्या परवानग्या मागितल्या आहेत हेही तुम्ही तपासू शकता. जे उपयुक्त नाहीत ते काढून टाका.
हे पण वाचा :- 7th Pay Commission: मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, वाढणार महागाई भत्ता; ‘या’ लोकांना होणार बंपर फायदा