Maharashtra MLC Election Result : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. या निवडणूक निकालामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का मिळाला आहे. भाजपने या निवडणुकीत पहिला विजय मिळवला आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांना पराभूत केले आहे. या मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजारांहून अधिक मते मिळाली आहेत तर बाळाराम पाटील यांना फक्त 9 हजार 500 मते मिळाली आहेत.
त्यामुळे महाविकास आघाडीला पहिलाच धक्का मिळाला आहे. भाजपच्या पहिल्या विजयामुळे भाजच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे.
ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, हा विजय माझा एकट्याचा नसून संपूर्ण शिक्षक मतदार संघाचा आहे. गेल्या सहा वर्षांत मी काय केले? त्याची पोचपावती आज कोकण विभागातील शिक्षकांनी दिली आहे. 33 संस्थांनी आम्हाला पाठिंबा दिला. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे फळ आज मिळाले आहे.
ठाकरे गटाची संघटना असलेल्या शिक्षक सेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत विचारले असता ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की, “या निवडणुकीत मी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय गटाचा उमेदवार होतो.
आम्ही शिक्षक सेना निर्माण केली आहे. कोकणात जेव्हा मी निवडणूक लढवली. शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच मी स्वतः शिक्षकांची फौज उभी केली. “मी शिवसेनेकडून (ठाकरे गट) उमेदवारी मागितली होती.
मात्र त्यांनी महाविकास आघाडीच्या रूपाने बाळासाहेब पाटलांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर भाजपने मला पाठिंबा दिला आणि म्हणून मी त्यांची उमेदवारी स्वीकारली असे ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले आहेत.