Mahindra Scorpio New Model : महिंद्रा कंपनीच्या कार अगोदरपासूनच बाजारात धुमाकूळ घालत आहेत. तसेच सर्वाधिक खप होणारी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ आता आणखी नवीन रूपात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीकडून स्कॉर्पिओचे नवीन मॉडेल सादर करण्यात आले होते.
आता कंपनीकडून स्कॉर्पिओ 7 आणि 9 सीटर कार उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिंद्रा कंपनीच्या कारला ग्राहकांकडून अधिक पसंती दिली जात आहे. तसेच आता ग्राहकांसाठी स्कॉर्पिओचे नवीन मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे.
सध्या बाजारात स्कॉर्पिओ दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. S आणि S11 हे स्कॉर्पिओचे दोन मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. लवकरच स्कॉर्पिओचे S5 मॉडेल बाजारात लवकरच लॉन्च होणार आहे.
कंपनीकडून स्कॉर्पिओचे नवीन मॉडेल लॉन्च होण्यापूर्वीच त्याची माहिती लीक झाली आहे. मात्र कंपनीकडून नवीन स्कॉर्पिओबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
नवीन स्कॉर्पिओमध्ये ७ सीटर आणि ९ सीटर पर्याय उपलब्ध असणार आहेत. S5 आणि S11 असे दोन प्रकारचे मॉडेल कंपनीकडून बाजारात लॉन्च केले जाणार आहेत.
वैशिष्ट्ये
नवीन S5 प्रकारात बॉडी रंगीत बंपर, स्टील व्हील्स, सेंट्रल लॉकिंग, ऑडिओ सिस्टम आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM सारखी वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.
LED DRL सह प्रोजेक्टर हेडलॅम्प, फॉलो-मी-होम हेडलॅम्प, रीअर वॉशर आणि वायपर आणि फ्रंट आर्म रेस्ट यासारख्या वैशिष्ट्यांपासून ते चुकू शकते. यात ड्युअल एअरबॅग्ज, कोलॅप्सिबल स्टीयरिंग, इंजिन इमोबिलायझर, सीट बेल्ट रिमाइंडर आणि सुरक्षिततेसाठी स्पीड अलर्ट यांसारखी वैशिष्ट्ये कंपनीकडून देण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंजिन आणि पॉवर
स्कॉर्पिओ क्लासिक 2.2-लिटर डिझेल इंजिनसह येते, जे जास्तीत जास्त 130 एचपी पॉवर आणि 300 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. सध्या बाजारात Scorpio Classic च्या बेस व्हेरियंटची किंमत 12.64 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरियंटची किंमत 16.14 लाख रुपये आहे.
या दोन्ही मॉडेलमध्ये जवळपास 3.5 लाख रुपयांचा फरक आहे. नवीन Scorpio मॉडेलच्या इंजिनमध्ये कंपनीकडून कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.