Mahindra Thar 5 Door : प्रतीक्षा संपणार! शक्तिशाली इंजिनसह लॉन्च होणार महिंद्रा थार 5 डोअर, जाणून घ्या नवीन फीचर्स आणि किंमत

Published on -

Mahindra Thar 5 Door : महिंद्रा कंपनीकडून थोड्याच दिवसांत लोकप्रिय झालेली थार आता पुन्हा एकदा नवीन रूपात लॉन्च केली जाणार आहे. ही कार अनेक नवीन फीचर्ससह लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पुन्हा एकदा थारचे नवीन मॉडेल खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे.

शक्तिशाली आणि दमदार फीचर्ससाठी थार भारतीय लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. ऑफरोडिंगसाठी महिंद्राच्या थार या कारचे नाव सर्वात पुढे आहे. सध्या महिंद्रा थार या कारचे मॉडेल चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता कंपनीकडून पुन्हा एकदा नवीन मॉडेल लॉन्च करण्यात येणार आहे.

सध्या बाजारात ३ डोअर मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर कंपनीकडून आता ५ डोअर मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. ग्राहकही थारच्या या मॉडेलची वाट पाहत आहेत. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात येणार आहेत.

इंजिन

सध्या थार कार ३ इंजिन पर्यायसह उपलब्ध आहे. बेस स्पेक 1.5-लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 118hp पॉवर आणि 300Nm टॉर्क निर्माण करते. दुसरे इंजिन 2.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे 152hp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे तिसरे इंजिन 2.2-लिटर डिझेल इंजिन आहे जे 130hp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते.

नवीन फीचर्स

महिंद्रा थार 5 डोअरला 3 डोअर मॉडेलपेक्षा 300MM अधिक व्हीलबेस कंपनीकडून देण्यात येऊ शकते. त्यामुळे कारमधील जागा देखील वाढत आहे. 5-डोर थारमध्ये 2.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.2-लीटर टर्बो डिझेल इंजिन दिले जाऊ शकते.

मारुती सुझुकी जिमनीशी स्पर्धा करेल

महिंद्रा कंपनीकडून २०२४ सुरुवातीस ही नवीन ५ डोअर थार सादर केली जाऊ शकते. महिंद्रा कंपनीकडून अद्याप या कारची किंमत स्पष्ट करण्यात आली नाही. सध्या थारच्या डिझेल प्रकारांची किंमत 9.99 लाख ते 16.49 लाख रुपये आहे, तर त्याच्या पेट्रोल पर्यायाची किंमत 13.49 लाख ते 15.82 लाख रुपये आहे.

महिंद्रा कंपनीकडून 5-डोर थार मारुती सुझुकी जिमनीशी स्पर्धा करेल असा दावा करण्यात येत आहे. मारुती सुझुकीकडून मे २०२३ मध्ये जिमनी कार लॉन्च केली जाणारा आहे. ऑटो एक्स्पोमध्ये जिमनी कार सादर करण्यात आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe