Maruti Jimny 5 Door vs Thar : महिंद्रा कंपनीच्या पहिल्यापासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आल्या आहेत. मात्र मारुती सुझुकीच्या गाड्याही काही कमी नाहीत. सर्वाधिक कार खपवणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकीचा यंदाही नंबर लागला आहे.
महिंद्रा कंपनीने थार गाडी ग्राहकांसाठी बऱ्याच दिवसापासून उपलब्ध करून दिली आहे. मात्र आता मारुती सुझुकी कंपनीने देखील थार गाडीला टक्कर देण्यासाठी मारुती जिमनी गाडी ग्राहकांसाठी सादर केली आहे.
ऑटो एक्स्पो २०२३ यामध्ये मारुती सुझुकीने धमाकेदार पद्धतीने ही गाडी सादर केली आहे. 5 डोअर व्हर्जनमध्ये ही जिमनी एसयूव्ही सादर करण्यात आली आहे. मात्र आता मार्केटमध्ये नक्की कोणती SUV धुमाकूळ घालणार हे पाहणे महत्वाचे आहे.
मारुती जिमनी लांबी, रुंदी आणि उंची
महिंद्रा थारसमोर मारुती जिमनी आकाराने थोडी कमी आहे. महिंद्रा थार 3 डोअर व्हर्जन 5 डोअर जिमनी पेक्षाही उंच आणि रुंद आहे. दोन्हीची लांबी जवळपास समान असताना.
त्याच्या 5-दरवाजा लेआउटमुळे, जिमनीचा व्हीलबेस थारपेक्षा 140 मिमी लांब आहे. ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीतही, महिंद्रा थार 16 मिमी अधिक जास्त आहे. जिमनीची पाणी वाहून जाण्याची क्षमता 300 मिमी आणि थारची 625 मिमी आहे. त्यामुळे महिंद्रा थार इथे टक्कर देताना दिसत आहे.
दोन्ही गाड्यांचे इंजिन आणि पॉवर
इंजिनच्या बाबतीतही महिंद्रा थार जिमनीला मागे टाकते. थारमध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत, ज्यात 1.5L डिझेल, 2.2L डिझेल आणि 2.0L पेट्रोल यांचा समावेश आहे. यात 4X4 आणि रियर व्हील ड्राइव्ह (4X2) ची सुविधा मिळते. जिमनीला फक्त 1.5 लिटर पेट्रोल मिळते आणि फक्त 4X4 मिळते.
किमतीमध्ये होणार सर्व खेळ
थार तुम्हाला मजबूत आणि दबंग अनुभव देईल, तर मारुती जिमनी ही एक सुंदर ऑफ रोड कार आहे. महिंद्रा थारची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने अद्याप मारुती जिमनीची किंमत जाहीर केलेली नाही.
अशा परिस्थितीत थारशी स्पर्धा करण्यासाठी जिम्नीला अत्यंत स्पर्धात्मक किमतीत आणले जाईल, असे मानले जात आहे. शिवाय मारुती जिमनीच्या चाकाचा आकारही थारपेक्षा लहान आहे. म्हणजे मायलेजच्या बाबतीतही ते थारपेक्षा सरस ठरू शकते.