Maruti Suzuki Swift Car : मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतामध्ये लोकप्रिय आहेत. तसेच सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकीला ओळखले जाते. तसेच मारुती सुझुकीची लोकप्रिय स्विफ्ट कार आता तुम्ही फक्त १ लाखात खरेदी करू शकता.
अनेकांचे स्वतःची कार असण्याचे स्वप्न असते. पण दिवसेंदिवस कारच्या किमती वाढत असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता तुम्ही देखील कमी बजेटमध्ये मारुतीची स्विफ्ट कार खरेदी करू शकता.
भारतामध्ये मारुती सुझुकीची स्विफ्ट कार अधिक लोकप्रिय आहे. तसेच या कारची विक्री देखील खूपच जास्त आहे. त्यामुळे या कारची किंमत देखील अधिक आहे. पण अनेकांना मारुतीची स्विफ्ट कारच आवडत आहे. कारण कमी किंमत आणि शानदार मायलेज मिळत असल्याने अनेकजण ही कार खरेदी करत आहेत.
मारुती सुझुकी स्विफ्ट
मारुती सुझुकीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. मात्र स्विफ्ट कार सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. तसेच अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत ही कार वर्चस्व करत आहे. आजही स्विफ्ट कार मारुती कार टॉप 10 बेस्ट सेलिंग कारच्या यादीत कायम आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट किंमत आणि विक्री
मार्च महिन्यात स्विफ्ट कार ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. या महिन्यात मारुती स्विफ्टच्या एकूण 17559 युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे आणि तीची ऑन रोड किंमत 8.89 लाख रुपयांपर्यंत जाते.
मारुती सुझुकी स्विफ्ट डाउनपेमेंट आणि EMI तपशील
जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही देखील ही कार EMI वर खरेदी करू शकता. स्विफ्ट कारचे बेस मॉडेल तुम्ही १ लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता. जर तुम्ही EMI वर ही कार खरेदी केली तर तुम्हाला फायनान्स कंपनीकडून ६ लाख रुपये कर्जाच्या स्वरूपात दिले जातील.
तुम्ही EMI वर ही कार खरेदी केली तर तुम्हाला दरमहा ९ हजार रुपयांचा EMI हफ्ता भरावा लागेल. हे कर्ज तुम्हाला ७ वर्षांसाठी 8 टक्के व्याज दराने दिले जाईल. त्यामुळे तुम्हाला जास्तीचे पैसे भरावे लागतील.
इंजिन
मारुती स्विफ्टमध्ये 1.2 लीटर डिझेल पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 90 पीएस पॉवर आणि 113 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. चांगल्या मायलेजसह, तुम्हाला स्टार्ट स्टॉप फीचर मिळेल.
वेग खूपच चांगला असून त्याच्या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे, ज्यामध्ये CNG पर्याय देण्यात आला आहे. स्विफ्ट सीएनजी मॉडेल 30 किमी प्रति किलोपर्यंत मायलेज देते.