Maruti Fronx CNG : ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वाधिक कार विकली जाणारी कंपनी मारुती सुझुकी आता पुन्हा एक ऑटो क्षेत्रात वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. आता कंपनीकडून नवीन स्पोर्टी स्टाइलिंग CNG SUV कार बाजारात दाखल केली जाणार आहे.
नोएडा मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये मारुती सुझुकी कंपनीने कॉम्पॅक्ट कूप स्टाइल SUV मारुती फ्रॉन्क्स कार सादर केली होती. मात्र त्यावेळी फ्रॉन्क्स CNG बाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. मात्र आता कंपनीकडून CNG व्हेरियंट SUV फ्रॉन्क्स कार सादर केली जाणार आहे.
मारुती सुझुकीच्या गाड्यांना ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच मारुतीच्या कारचा खप दिवसेंदिवस वाढत आहे. या कंपनीच्या काही कार सोडल्या तर इतर सर्व कार CNG व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत.
मारुती सुझुकी कंपनीकडून लवकरच येत्या एप्रिल महिन्यात SUV फ्रॉन्क्स कार लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीकडून ही कार नेक्सा डीलरशिपद्वारे विकली जाणार आहे. नेक्सा डीलरशिपद्वारे विकली जाणारी मारुती सुझुकीचे चौथे सीएनजी मॉडेल असणार आहे.
मारुती फ्रॉन्क्स सीएनजी कार कशी असेल?
मारुती कंपनीकडून फ्रॉन्क्स SUV कारचे फीचर्स आणि तपशील आगोदरच उघड केले आहेत. कंपनीकडून या फ्रॉन्क्स SUV कारमध्ये कंपनी फॅक्टरी फिटेड CNG किट वापरले नजणार आहे जे 1.2 लिटर पेट्रोलसह देण्यात येणार आहे.
कारमधील पेट्रोल इंजिन 90hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते, तर CNG मोडमध्ये त्याची पॉवर 77hp इतकी कमी होईल. कंपनीकडून CNG कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात येणार आहे.
फ्रॉन्क्स सीएनजी कारमध्ये असणार ही वैशिष्ट्ये
कंपनीकडून या कारमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात येणार आहेत. इतर कारपेक्षा अधिक वेगळे फीचर्स या फ्रॉन्क्स CNG एसयूव्हीमध्ये देण्यात येणार आहेत.
वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, व्हॉइस असिस्टंट वैशिष्ट्यासह स्मार्टप्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्स, 4-स्पीकर साउंड सिस्टम, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल विंग मिरर आणि स्टीयरिंग व्हील-माउंटेड आहे.
कारची किंमत आणि मायलेज
मारुती सुझुकी कंपनीकडून लॉन्च करण्यात येणाऱ्या फ्रॉन्क्स सीएनजी कारची किंमत अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र ही कार कमी किमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
फ्रॉन्क्स सीएनजी कारची किंमत अंदाजे किंमत 8 लाख ते 11 लाख रुपये असू शकते. मात्र कंपनीच्या वेगवेगळ्या CNG व्हेरियंटची किंमत वेगवेगळी असू शकते. फ्रॉन्क्स पेट्रोल कारची किंमत सीएनजी मॉडेलपेक्षा अधिक असू शकते.
फ्रॉन्क्स पेट्रोल कार 30 kmpl मायलेज देईल असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे Fronx CNG मॉडेल देखील याच्या आसपास मायलेज देऊ शकते. लवकरच कंपनीकडून कारच्या लॉन्चबाबत घोषणा केली जाऊ शकते.