Chanakya Niti : लग्नाआधी स्त्री आणि पुरुषांनी अनेक गोष्टी जाणून घेतल्याने त्यांनाच नात्यामध्ये आंनदी राहण्याचा फायदा होतो. आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा आजही विवाहबंधनात अडकलेल्या जोडप्यांना फायदा होत आहे.
आचार्य चाणक्ययांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितली आहेत. सुखी संसार, धनलाभ आणि नात्यात सुख शांती याबद्दल अनेक गोष्टी चाणक्यांनी सांगितल्या आहेत.

आचार्य चाणक्य यांची धोरणे आजही उपयोगाला येत आहेत. पती-पत्नीच्या नात्यामधील प्रेमात कशी जवळीक येईल याचाही उल्लेख चाणक्यनीती मध्ये करण्यात आला आहे.
पती पत्नी संसारात सुखी आणि यशस्वी होण्यासाठी चाणक्यांनी अनेक मार्ग सांगितले आहेत. पती पत्नीच्या वयामध्ये जास्त फरक नसावा. फरक असावा पण तो कमी असावा. फरक नसेल तर नात्यातील आनंद कमी होतो.
स्त्री आणि पुरुष शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप निरोगी असावेत. दोघांमधील वयाचा फरक जितका कमी असेल तितके चांगले असते. अन्यथा, समन्वय राहणार नाही आणि एकमेकांच्या गरजा पूर्ण न केल्यामुळे संबंध तुटू शकतात आणि दोघांमध्ये नाराजी पसरू शकते.
तरुण मुलींचे जास्त वय असणाऱ्या व्यक्तीसोबत कधीच लग्न होऊ शकत नाही आणि जर झाले तर त्यांच्या नात्यामध्ये लवकरच दुरावा निर्माण होऊ शकतो. कारण एकमेकांना समजून घेण्यासाठी वयामध्ये कमी फरक असावा लागतो. वय जास्त असल्याने एकमेकांना समजून घेणे शक्य होणार नाही.
पती आणि पत्नीने एकमेकांचा आदर केला पाहिजे. एकमेकांच्या चुका उणीव सारख्या दाखून देणे हे देखील नात्यासाठी धोकादायक ठरू शकते. भांडण आणि इतर समस्या असतील तर त्या दोघांनी मिळून सोडवाव्यात. अन्यथा दोघांना त्रास होऊ शकतो.