अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- आऊटडोर शुटींगदरम्यान ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती अचानक सेटवर कोसळले. विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचं शुटींग दरम्यान हा प्रकार घडला आहे.
या घटनेमुळे चित्रपटाचं शूटींग थांबविण्यात आलं आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने सांगितले की, ‘आम्ही लोक एक मोठ्या अॅक्शन सीनचं शूटींग करत होतो. सगळं काही ठिक सुरू होतं.
पण पोटात संक्रमण झाल्यामुळे मिथुन आजारी पडले होते. कोणताही सामान्य माणूस अशा कंडीशनमध्ये उभा राहू शकत नाही. पण अशा स्थितीतही ते बाहेर आले आणि त्यांनी त्यांचा पूर्ण सीन शूट केला.
कदाचित यामुळे मिथुन सुपरस्टार आहेत’. अभिनेते मिथुन मोठ्या पडद्यावर 2019 साली विवेक अग्निहोत्री यांच्या ‘ताश्कंद फाईल’ या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित आहे.
आता ते त्यांच्याच दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या द कश्मीर फाईल्स या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मसूरीत दाखल झाले होते. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात अनुपम खेर, पुनित इस्सार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com