Government Scheme : केंद्र सरकार सतत देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत आहे. अशा योजनांचा देशातील लाखो नागरिकांना फायदा होत आहे. मोदी सरकारची अशी एक योजना आहे ज्यामधून १० लाख रुपये मिळत आहेत.
छोट्या मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारकडून २०१५ मध्ये पंतप्रधान मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेतून छोट्या व्यावसायिकांना केंद्र सरकारकडून कर्ज दिले जात आहे.
काय आहे मुद्रा योजना?
मोदी सरकारने २०१५ मध्ये छोट्या व्यावसायिकांसाठी मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेतून व्यावसायिकांना 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. PMMY अंतर्गत बिगर-कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु/सूक्ष्म उद्योगांना हे कर्ज दिले जाते.
कर्जाची रक्कम
या योजनेतील कर्जाची रक्कम तीन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. यात ‘बाल’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’चा समावेश आहे. या तीन श्रेणींमध्ये वेगवेगळ्या कर्जाची रक्कम दिली जाते.
शिशू अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. किशोर अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. आणि तरुण अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
कर्ज अर्ज कसा करायचा
मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घ्यायचे असेल, तर हे कर्ज कमर्शियल बँक, आरआरबी, स्मॉल फायनान्स बँक, एमएफआय, एनबीएफसी यांच्यामार्फत दिले जाते. ज्याला कर्ज हवे आहे ते या बँकांशी संपर्क साधू शकतात किंवा www.udyamimitra.in वर जाऊन अर्ज करू शकतात.