मोदीजी, मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकत नाही, असं पुतीन का म्हणाले?

Published on -

India News:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस असून भारतासह जगभरातील नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

मात्र, काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचीच्याशी त्यांची चर्चा झाली. यावेळी पुतीन यांनी मोदींना शुभेच्छा देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, “उद्या तुमचा वाढदिवस आहे.

पण मी आज तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही. कारण रशियन परंपरा परवानगी देत नाही. पण मी भारताला मैत्रीपूर्ण शुभेच्छा देतो.

” रशियन प्रथा परंपरानुसार वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच अडव्हॉन्समध्ये शुभेच्छा दिल्या जात नाहीत. त्यामुळे पुतीन यांनी मोदींना काल शुभेच्छा देणे टाळले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe