मुकेश अंबानी याना कोण ओळखत नाही. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. फोन असो वा इंटरनेट ते अग्रेसर असतात. आता मुकेश अंबानी यांकडून पुन्हा मोठा धमाका होण्याचे संकेत आले आहेत. मुकेश अंबानी आता ग्राहकांना 6G देणार आहेत.
रिलायन्सने आजपर्यंत आपले वचन पाळले आहे. आधी सर्वात स्वस्त कॉल, मग स्वस्त थ्रीजी नेट आणि नंतर 4G. कंपनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. रिलायन्स प्रत्येक क्षेत्रात जबरदस्त महसूल मिळवत आहे. आणि आता बातमी अशी आहे की देशातील पहिले सर्वात स्वस्त 6G नेट देखील रिलायन्स देणार आहे. त्यासाठी कंपनी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
मुकेश अंबानी यांकडे आहेत अनेक प्लॅन
वास्तविक मुकेश अंबानी सध्या अनेक गोष्टींवर काम करत आहेत. दुसरीकडे, रिलायन्स जिओ देखील स्पेस फायबरसाठी सज्ज आहे. यामुळे देशातील करोडो गावांना स्वस्त दरात चांगल्या दर्जाचे इंटरनेट मिळणार आहे. कंपनीने आधीच सांगितले आहे की ते यासाठी सर्वात स्वस्त दर योजना बनवणार आहेत.
रिलायन्स जिओचे 5G नेटवर्क मजबूत
एका रिपोर्टनुसार कंपनी 6G साठी सरकारशी बोलणी करत आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की जिओकडे सध्या सर्वात जास्त ग्राहक आहेत आणि जिओकडे एअरटेलपेक्षा जास्त नेटवर्क देखील आहे. म्हणजेच 5G तंत्रज्ञानाचे 6G मध्ये रूपांतर करण्यात फारशी अडचण येणार नाही.
AGR कडून कोणताही दबाव नाही
कंपनीच्या या प्लॅनवर नजर टाकली तर रिलायन्स इतर कंपन्यांपेक्षा पुढे असल्याचे दिसून येते. TRAI च्या आकडेवारीनुसार, 2023 पर्यंत, Jio हे Airtel सह Vodafone Idea च्या 2.5 टक्के दराने पुढे निघून जाईल. कंपनीवर कोणतीही AGR अमाउंट शिल्लक नाही, त्यामुळे कंपनीला आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही.