Narendra Modi : शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची चर्चा? देशात रंगली चर्चा..

Published on -

Narendra Modi : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजघडीला देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांची लोकप्रिय दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून खंबीरपणे देशाचे नेतृत्त्व करणारे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती.

नोबेल समितीमधील सदस्याकडूनच तसे संकेत देण्यात आल्याची चर्चा होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठीचे प्रबळ दावेदार असल्याचे वक्तव्य नोबेल समितीचे सदस्य ॲस्ले टोजे यांनी केले आहे.

असे असताना मात्र टोजे यांनी आपण असा दावा केल्याचे वृत्त फेटाळले. असे असताना त्यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यास ती भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब ठरेल. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.

त्यामुळे मोदी यांना नोबेल पुरस्कार मिळाला तर त्यांच्यासारख्या सक्षम नेत्याच्यादृष्टीने तो ऐतिहासिक क्षण ठरेल. टोजे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया आणि इतर व्यासपीठांवर पंतप्रधान मोदींना नोबेल पुरस्कार मिळणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.

नरेंद्र मोदी हे केवळ भारतालाच पुढे नेत नाहीत तर ते जगात शांतता नांदण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत. नरेंद्र मोदी हे जगातील शांततेसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याचे मत टोजे यांनी व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe