Natthu Singh : आजकाल अनेक ठिकाणी मुलं ही आईवडिलांना म्हतारपणी संभाळत नाहीत. यामुळे त्यांना मोठा त्रास देखील होतो. विशेष म्हणजे नोकरदार वर्ग हे आईवडिलांना संभाळत नसताना दिसून येते. आता पोटच्या मुलांनी वडिलांचा सांभाळ करायला नकार दिला, त्यांना वृद्धाश्रमात टाकले. निराश झालेल्या वडिलांनी त्यांची संपूर्ण संपत्ती राज्यपालांच्या नावे केली आहे.
तसेच मृत्यूनंतर अंतिम संस्कार हे मुलाच्या हातून होऊ नयेत, असेही मृत्यूपत्रात म्हटले आहे. यामुळे याची चर्चा रंगली आहे. नत्थू सिंह गेल्या सात महिन्यांपासून वृद्धाश्रमात राहतात. नत्थू सिंह यांनी आपल्या लेकाला धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

त्यांनी नाराज होऊन जवळपास १० एकर जमीन व घरसह स्वतःचे शरीरही उत्तर प्रदेश सरकारच्या नावावर केले आहे. या जमिनीची किंमत करोडो रुपये आहे. त्यांना दोन मुलं चार मुली आहेत. रोजच्या भांडणाला वैतागून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक मुलगा शिक्षक आहे.
सून आणि मुलांनी छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांना अनेकदा मारहाण केली आहे. तसेच 20 वर्षांपासून ते स्वतः जेवण बनवून खातात. दरम्यान, त्यांनी दान केलेल्या जमिनीत सरकारने शाळा बांधावी असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या जमिनीवरही कब्जा करण्यात आला. अशावेळी त्यांनी सरकारकडेच मदतीची मागणी केली. नत्थू सिंह यांनी मृत्यूपत्र बनवत त्यांची पूर्वजांची जमिन सरकारला दान केली आहे. तसेच, आपल शरीरही मेडिकल कॉलेजला दान केले आहे. यामुळे याची चांगलीच चर्चा सुरू आहे.