भारताच्या ४० टक्के निर्यात शुल्काचा नेपाळला फटका

India News : भारताने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या निर्णयाचा नेपाळला फटका बसला आहे. या देशाला आता कांदा तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. नेपाळमध्ये कांद्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यात भारताने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचे जाहीर केले.

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर किमती वाढण्याच्या भीतीने हे पाऊल उचलण्यात आले. भारताच्या ४० टक्के निर्यात कराचा सर्वाधिक फटका नेपाळला बसला आहे. नेपाळमधील सर्वात मोठ्या घाऊक बाजार कालीमाटी फ्रुट अँड व्हेजिटेबल मार्केट मध्ये व्यापाऱ्यांना कांद्याचा अचानक तुटवडा जाणवू लागल्याचे काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

‘कालीमाटी फ्रुट अँड व्हेजिटेबल मार्केट’ मध्ये घाऊक बाजाराचे माहिती अधिकारी बिनय श्रेष्ठ यांनी नेपाळच्या बाजारपेठेत कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रविवारपासून कांद्याची एकही खेप वितरित झालेली नाही आणि उर्वरित साठा सोमवारपर्यंत रिकामा होईल.

दोन आठवड्यांपूर्वी कांद्याचा भाव ५४ रुपये प्रति किलो होता, मात्र आता काठमांडू खोऱ्यात कांद्याचा किरकोळ भाव १०० रुपये किलोच्या पुढे गेला आहे, असे सांगितले. नेपाळ आपल्या कांद्याच्या गरजेसाठी जवळजवळ संपूर्णपणे भारतावर अवलंबून आहे.

निर्यात करामुळे देशांतर्गत बाजारपेठेत मोठी टंचाई निर्माण झाली आहे. किमती आणखी वाढू शकतात, याबद्दल आताच अंदाज बांधणे कठीण आहे, असे श्रेष्ठ यांनी सांगितले.

बटाटा- कांदा आयात-निर्यात आणि घाऊक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन बनिया यांनी निर्यात शुल्क लागू झाल्यानंतर कालीमाटी बाजारात कांद्याचा घाऊक भाव सोमवारी ७८ रुपये किलो झाल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe