Netflix New Rule : नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना कंपनीने मोठा झटका दिला आहे. आता कंपनीकडून पासवर्ड शेअरिंगसाठी अधिक पैसे कापले जाणार आहेत. त्यामुळे पासवर्ड शेअर करणे महाग होणार आहे. जर तुम्हीही तुमच्या नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
नेटफ्लिक्सकडून या वर्षातील एप्रिल महिन्यापासून मोफत पासवर्ड शेअरिंग बंद केले जाणार आहे. जर तुम्हाला पासवर्ड शेअर करायचा असेल तर त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही पासवर्ड शेअर केला तर तुमच्या खात्यातून पैसे कापले जाणार आहेत.
कंपनीने काय म्हटले?
कंपनीने सांगितले की, ‘पहिल्या तिमाहीपासून कंपनी पेड शेअरिंग फीचर सुरू करणार आहे. 100 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्ये सध्या खाते सामायिकरण वापरतात. व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही सुधारणा करत आहोत.
कंपनीचे म्हणणे आहे की एक खाते फक्त एका वापरकर्त्यासाठी असेल. खात्याचा पासवर्ड दुसऱ्याला दिल्यास पैसे द्यावे लागतील. प्लॅटफॉर्म सदस्यांना त्यांचे खाते कोणते उपकरण वापरत आहेत याचे पुनरावलोकन करण्याचा पर्याय प्रदान करेल आणि नवीन खात्यात प्रोफाइल हस्तांतरित करण्याचा पर्याय देखील असेल.
भरावे लागणार जास्त पैसे
नेटफ्लिक्सकडुन आता अॅपमध्ये नवीन पर्याय दिला जाणार आहे. जर तुम्हाला पासवर्ड शेअर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिला जाणार आहे. समोरील व्यक्तीने पेमेंट केले तरच त्याला नेटफ्लिक्स वापरता येणार आहे.
अशी करणार ओळख
नेटफ्लिक्स आयपी अॅड्रेस, डिव्हाइस आयडी आणि अकाउंट अॅक्टिव्हिटीद्वारे नवीन पासवर्ड शेअरिंग नियम लागू करेल. याद्वारे नेटफ्लिक्सकडुन ओळख पटवली जाईल.