Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी चाणक्य नीती या ग्रथांमध्ये अनेक मार्ग सांगितले आहेत. त्या मार्गाचा अवलंब करून तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. तसेच माणसाने जीवनात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या नाहीत याचेही मार्गदर्शन चाणक्यांनी केले आहे.
माणसाच्या नगात काही वाईट गुण असतात. त्याचा स्वतःच्याच जीवनावर वाईट परिणाम होतो असेही आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. त्याने किती यश मिळवण्याचा प्रयत्न केला तरीही तो वाईट गुणामुळे यश मिळवू शकत नाही.
माणसाच्या अंगात या ४ वाईट सवयी नक्की असतात. त्यांनी त्या सवयी आजपासूनच सोडल्या पाहिजेत अन्यथा त्याचा यशस्वी होण्यामध्ये खूप अडथळा येतो.
कोणत्या ४ वाईट सवयी चाणक्यांनी सांगितल्या आहेत
१. भेदभावाची सवय
मानवाच्या अंगात कधीही भेदभावाची सवय नसावी. दुसऱ्या व्यक्तींबद्दल वाईट विचार करणारे लोक कधीही जीवनात यशस्वी होत नाही. असे लोक अहंकारामुळे नेहमी अयशस्वी होत असतात.
२. निधीचा गैरवापर
माणसाने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. जे इतरांचे नुकसान करण्यासाठी पैशाचा चुकीचा वापर करतात, त्यांची प्रतिमा ढोंगी अशी बनते. असे लोक आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. माता लक्ष्मी देखील अशा लोकांपासून दूर जाते. त्यामुळे कधीही ही चूक करू नका.
३. वाईट आणि वाईट संगत
कोणीही कधीही वाईट सांगत धरू नये तसेच कोणाबद्दलही वाईट बोलू नये. असे लोक अधोगतीची मार्गावर जात असतात. चुकीची सांगत आयुष्य बरबाद करण्यास मदत करतात. तसेच नातेवाईक आणि कुटुंब देखील असा लोकांपासून दुरावते.
४. राग आणि लोभ
मनुष्याने लोभ आणि क्रोधापासून दूर राहिले पाहिजे. हे दोघे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जे लोक या दोन वाईट सवयींकडे आकर्षित होतात, त्यांचे आयुष्य नरकापेक्षाही वाईट व्हायला वेळ लागत नाही. अशा लोकांपासून यश नेहमीच दूर पळते.