Mahindra Bolero : भारतीय ऑटो क्षेत्रात महिंद्रा कंपनीच्या कारचा पहिल्यापासूनच दबदबा आहे. तसेच महिंद्रा कंपनीकडून दिवसेंदिवस अनेक नवीन कार सादर केल्या जात आहेत. मात्र आता ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिलेली महिंद्रा बोलेरो कार आता पुन्हा नव्या रूपात ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.
महिंद्रा बोलेरो कारला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तसेच अजूनही ही कार भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अधिक लोकप्रिय आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात या कारची विक्री होत आहे.
पण आता कंपनीकडून नवीन महिंद्रा बोलेरो मॉडेल बाजारात सादर केले जाणार आहे. या कारचे नवीन मॉडेल अधिक आकर्षक असेल आणि ग्राहकही या कारला चांगला प्रतिसाद देतील असा कंपनीकडून दावा करण्यात येत आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लवकरच भारतात एक आलिशान 9 सीटर SUV सादर करणार आहे. कंपनी लवकरच सर्वात जास्त विक्री होणाऱ्या बोलेरो महिंद्रा बोलेरो निओ प्लसची नवीन आवृत्ती लॉन्च करेल.
नवीन डिझाइनसह लॉन्च करा
कंपनीकडून नवीन महिंद्रा बोलेरो डिझाईन बद्दल अधिकृत माहिती मिळाली आहे. या नवीन कारचे डिझाईन जवळपास बोलेरो निओ सारखेच असले तरी धिक सीटसाठी व्हीलबेस वाढवण्यात आला आहे.
एसयूव्हीची साइड प्रोफाइल सात-सीटर आवृत्तीसारखीच आहे. पण जवळून पाहिल्यास एक लांब मागील क्वार्टर ग्लास, एक मोठा टेललाइट क्लस्टर, अधिक वक्र टेलगेट आणि नवीन मागील बंपर दिसून येतो.
इंजिन पूर्वीसारखेच असेल
नवीन बोलेरो कारला पूर्वीप्रमाणेच 1.5-लिटर इंजिन मिळत राहील. हे इंजिन 75bhp पीक पॉवर आणि 210Nm पीक टॉर्क निर्माण करते. या तीन-सिलेंडर ऑइल बर्नरमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स ऑफर आहे.
नवीन आवृत्तीची किंमत किती असेल?
नवीन महिंद्रा बोलेरोमध्ये टर्बो डिझेल इंजिन व्हर्जनही येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पहिल्या कारपेक्षा नवीन कारची किंमत कमी असेल आसा देखील दावा करण्यात येत आहे. नवीन SUV ची सुरुवातीची किंमत 10 लाख एक्स-शोरूम असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.