New Rules: येत्या काही दिवसात 2022-23 आर्थिक वर्ष संपणार आहे आणि देशात 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो देशात 1 एप्रिलपासून काही नियम बदलणार आहे ज्याचा परिणाम देशातील सर्व नागरिकांवर होणार आहे.
यामुळे आज आम्ही तुम्हाला देशात 1 एप्रिल 2023 पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हे बदल आर्थिक व्यवहार, सोन्याचे दागिने इत्यादींशीही संबंधित आहेत. चला मग जाणून घ्या देशात 1 एप्रिल 2023 पासून कोणते नियम बदलणार आहेत.
सोन्याच्या दागिन्यांची विक्री
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे म्हणणे आहे की 1 एप्रिलपासून हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) शिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन सरकारने असा निर्णय घेतला आहे की 31 मार्च 2023 नंतर HUID हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीस परवानगी दिली जाणार नाही.
पॅन कार्ड-आधार कार्ड लिंकिंग
31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. यानंतर 1 एप्रिल 2023 पासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. पॅन कार्ड निष्क्रिय केल्यामुळे लोकांना आयकर भरण्यात अडचण येऊ शकते आणि अधिक करही जमा होऊ शकतो. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यामुळे लोकांना आर्थिक व्यवहार करण्यात आणि आयकर भरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
इंधनाच्या किमती
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे नवीन दर सरकारी तेल कंपन्यांकडून जारी केले जातात. मार्च महिन्यातच एलपीजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. अशा परिस्थितीत यंदाही 1 एप्रिल रोजी इंधनाच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- Mahashtami 2023: बाबो .. तब्बल 700 वर्षांनंतर होणार ग्रहांचा महासंयोग ; ‘या’ राशींसाठी सुरू होणार अच्छे दिन !