नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर जवळपास तीन महिने रिक्त असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर सोनिया गांधी यांची नियुक्ती झाली. सोनिया गांधींची निवड म्हणजे ‘खोदा पहाड और निकली चुहिया’आणि पुढे ‘वो भी मरी हुई’ असे वक्तव्य केल्याने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस संतापली असून, त्यांच्या टीकेतून भाजपाचे महिलांशी असभ्य वर्तन करण्याच्या संस्कृतीचे दर्शन झाले असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सोनिपत येथील निवडणूक सभेत बोलताना काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या मुद्यावरून त्यांनी टीका केली. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला, याची जबाबदारी स्वीकारत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी कित्येक दिवस राहुल गांधींची मनधरणी केली.

जवळपास तीन महिन्यांनंतर सोनिया गांधींची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचा विषय भाषणातून मांडताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोनिया गांधींची निवड म्हणजे ‘खोदा पहाड और निकली चुहिया’आणि पुढे ‘वो भी मरी हुई’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त करत, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- CISF Sports Quota Jobs 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंना नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 403 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती…
- 18 मे – 10 जून 2025 दरम्यान बँकांना ‘इतके’ दिवस सुट्टी राहणार ! वाचा सविस्तर
- भारतात आढळतो किंग कोब्रापेक्षाही विषारी साप ! ‘या’ सापाच्या दंशाने व्यक्ती वाचली तरी पॅरालिसीस होऊ शकतो
- पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विमानतळासारखे भव्य बसस्थानक ! 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर